जळगाव : भाजपत जाण्याच्या घोषणेमुळे ‘लेकीने’ फेसबुक वरील ‘वडीलांचे’ छायाचित्र हटवले

जळगाव : भाजपत जाण्याच्या घोषणेमुळे ‘लेकीने’ फेसबुक वरील ‘वडीलांचे’ छायाचित्र हटवले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
घराणेशाहीपासून राजकारणाचे बाळकडू मिळत असल्याने सध्या एकाच घरातील व्यक्ती निवडणूकीच्या रणांगणात मात्र वेगवेगळ्या राजकीय पक्षाची साथ देऊन हातात हात देत आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटातून स्वगृही भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांची कन्या तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे- खेवलकर यांनी आपल्या फेसबुक पानावर असलेले एकनाथ खडसे यांचे छायाचित्र हटविले आहे.

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथराव खडसे हे पुन्हा स्वगृही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले व लवकरच याबाबत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचेही जाहीर केले आहे. ही घोषणा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आपल्या फेसबुक वरील फोटो बदविला आहे. यामध्ये पूर्वी शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, एकनाथराव खडसे व रोहिणी खडसे यांचे छायाचित्र होते. खडसे भाजपात जाणार हे जाहीर होताच त्यांनी आपल्या फेसबुक वरील छायाचित्र बदलून त्यामध्ये शरद पवार शरद पवार गटाचे नवीन चिन्ह तुतारी जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र ठेवले आहे. त्यामधून वडील एकनाथ खडसे जे राष्ट्रवादी सोडणार आहेत. त्यांच्या छायाचित्र मधून तरी त्यांनी राष्ट्रवादी सोडल्याचे एक प्रकारे जाहीरच करून टाकले आहे.

पूर्वी असलेले फेसबुक पानावरील छायाचित्र
पूर्वी असलेले फेसबुक पानावरील छायाचित्र

एकनाथ खडसे भाजपमध्ये जात असल्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार कोण, यावर काही दिवसांपासून चर्चा सुरु होती. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अ‍ॅड. रोहिणी खडसे आणि जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यात झालेल्या चर्चेनंतर अखेर रावेरचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सध्यस्थितीत असलेले फेसबुक पानावरील छायाचित्र
सध्यस्थितीत असलेले फेसबुक पानावरील छायाचित्र

वडील एकनाथ खडसे भाजपमध्ये जात आहेत. मात्र त्यांची कन्या मात्र अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ खडसे यांची सुन रक्षा खडसे यांना भाजपने तिसर्‍यांदा उमेदवारीची संधी दिली आहे. आता सासरे आणि सून एकाच पक्षात, तर वडील व कन्या वेगवेगळ्या पक्षात असतील. यामुळे अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी त्यांच्या फेसबुक पानावर असलेले वडील एकनाथ खडसे यांचे छायाचित्र हटवले आहे. अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांना पक्षाकडून मुक्ताईनगर विधानसभेची उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. वडील खडसेंसोबत अनेक वर्षे मी काम करीत आले आहे. त्यांच्या निर्णयामुळे एकटे पडल्यासारखे वाटत आहे. कोणत्या पक्षात थांबायचे, कुठे काम करावे आणि कुठे काम करू नये, याबाबतचा निर्णय झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नाही. भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत राहणार असून, पक्षातील प्रत्येक जण माझ्यासोबत आहे. आता मी माझ्या पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जाणार आहे, असे अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news