चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर दोन दिवसांपासून तापमानाचा पार वाढला आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव उष्ण ठरला आहे. त्या पाठोपाठ पूर्वविदर्भातील चंद्रपूरला मागेटाकीत अकोला चांगलाच तापला आहे. अवकाळी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता, परंतु आता सुर्य आग ओकू लागल्यामुळे पारा पुन्हा चढण्याची शक्यता आहे.
मार्च महिण्याच्या मध्यापासून तर एप्रिल व मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाने राज्यात थैमान घातले होते. यामुळे पिकांचे व भाजीपाला बागांचे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाळ्यापासून काही दिवस नागरिकांची सुटका झाली होती. मात्र, सध्या राज्यात काही जिल्हे वगळता पुन्हा सुर्य आग ओकू लागल्याने महाराष्ट्र तापला आहे. यामुळे राज्यातील काही जिल्हे वगळता सर्वच जिल्ह्याचे तापमान चाळीशी पार गेले आहे. यामध्ये जळगावच्या तापमानात उसळी आली आहे. आज जळगाव मध्ये राज्यातील सर्वात जास्त ४४.६ तापमानाची नोंद करण्यात आली.
त्यापाठोपाठ पूर्वविदर्भातील अकोल्याने नेहमी उष्ण असलेल्या चंद्रपूरला मागे टाकले आहे. या ठिकाणी ४३.,५ अशी नोंद करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील बुलढाण वगळता सर्वच जिल्हे चाळीशीपार गेले आहेत. त्यामध्ये ४१.८, गडचिरोली ४०.६,गोंदिया, नागपूर, वर्धा ४०.२ तर यवतमाळ ४०.५, वाशीम ४०, चंद्रपूर व ब्रम्हपूरी अनुक्रमे ४०.४ व ४०.२ अशी नोंद घेण्यात आली आहे.
मराठवाड्यात उस्मानाबाद व उदगीर वगळता औरंगाबाद, बिड, नांदेड, परभणी अनुक्रमे ४०.२,४१.४,४१.४, ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आली. मध्य महाराष्ट्रात व राज्यात सर्वात जळगाव सर्वात जास्त उष्ण ठरले आहे. जळगावमध्ये ४४.६ अंशी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. महाबळेश्वर,कोल्हापूर, सातारा, सांगली वगळता सर्व जिल्हा चाळीशीपार गेले आहेत.
सध्या पूर्वविदर्भातील भंडारा, गोंदिया चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उन्हाळी धानपिकाची लागवड करण्यात आली होती. परंतु अवकाळीने मोठे नुकसान झाले आहे. अवकाळीतून वाचलेले धानपिके आता कापायला आली आहेत. परंतु हवामान खात्याने पुन्हा दिलेला अवकाळीचा इशारा शेतकऱ्यांची धडकी भरविणारा आहे. जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा गडचिरोली नेहमीच कुल राहायचा . परंतु गडचिरोलच्या तापमानात सतत वाढ होत आहे. आज गडचिरोलीचे तापमान ४१.६ अंशावर चढले आहे.
हेही वाचा;