नागपूर विमानतळावर १.८० कोटींचे सोने जप्त | पुढारी

नागपूर विमानतळावर १.८० कोटींचे सोने जप्त

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवार (दि.१०) कतार एअरवेजच्या विमानाने आलेल्या एका आंतरराष्ट्रीय तस्कराकडून ३.३६ किलो सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत १.८० कोटी रुपये आहे.

मुंबई एनसीबीच्या पथकाला याविषयीची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी मंगळवारी (दि.९) रात्रीपासून विमानतळावर निगराणी ठेवली होती. हा प्रवासी विमानातून उतरल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याच्या जीन्स पॅन्टच्या आत सात खिसे आढळून आले. यामध्ये पेस्टच्या स्वरूपात पाकिटामधून सोने तस्करी होत असल्याच्या प्रकार उघडकीस आला.

एनसीबीच्या पथकाने त्याला पुढील कारवाईसाठी कस्टमच्या ताब्यात दिले आहे. सोने तस्करीची ही तिसरी घटना आहे. पहाटेच्या सुमारास येणाऱ्या कतारच्या विमानांमधून सोने तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघडकीस आले आहे.

हेही वाचा;

Back to top button