जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

file photo
file photo
Published on
Updated on

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा जामनेर-बोदवड रस्त्यावर शुक्रवारी रात्री आठ वाजता दोन मोटरसायकल आणि एका कारमध्ये विचित्र अपघात झाला. यामध्ये तीनजण जागीच ठार झाले, तर तीन जण जखमी झाले आहेत.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जामनेरहून बोदवडकडे मोटरसायकलवर सुनील वही व दत्तू माळी हे निघाले होते. त्या पाठोपाठ ईश्वर पारधी हेही दुचाकीवरून निघाले होते. यादरम्‍यान मालदाभाडी जवळ दोन मोटर सायकल व एका चार चाकी वाहन यांच्यामध्ये विचित्र अपघात झाला. यामुळे दुचाकी वाहन चालक बाजूला फेकले गेले. यावेळी एकमेकांवर वाहने आदळल्याने वाडी किल्ला येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर त्रंबक स्पर्धे राहणार मालदावाडी तालुका जामनेर, सुनील शांताराम भोई राहणार जामनेर रोड बोदवड, दत्तू रामा माळी माळीवाडा बोदवड हे तिघे जागीच ठार झाले. यावेळी चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यामधील तीनजण जखमी झाले आहेत. कारमधील तीन महिला गंभीर जखमी झाल्‍या आहेत. या महिलांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना रूग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. रात्री उशीरापर्यंत याबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news