जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना रहीम उल्ला तारिक. दुसर्‍या छायाचित्रात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर. (संग्रहित छायाचित्र) 
जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना रहीम उल्ला तारिक. दुसर्‍या छायाचित्रात मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर. (संग्रहित छायाचित्र) 

पाकिस्‍तानमधील कराचीत ‘जैश-ए-मोहम्मद’च्‍या म्होरक्याचा खात्‍मा

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मौलाना मसूद अझहरचा निकटवर्ती आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना रहीम उल्ला तारिक याची कराचीमध्‍ये गोळा घालून हत्‍या करण्‍यात आली. तो भारताविरोधात जमलेल्या गर्दीला संबोधित करण्‍यापूर्वीच त्‍याचा खात्‍मा करण्‍यात आल्‍याचे सूत्रांनी सागितले.

मागील आठवड्यातच 'लष्कर-ए-तैयबा'चा प्रमुख हाफिज सईदचा जवळचा सहकारी 'अक्रम खान ऊर्फ अक्रम गाझी' याचीही पाकिस्तानातील बाजापूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्‍या केली होती. विशेष म्‍हणजे, या वर्षीभरात आतापर्यंत पाकिस्‍तानात मारल्या गेलेल्या भारतविरोधी १९ वा दहशतवादी ठरला आहे.

गेल्या आठवड्यात जम्मूमधील सुंजवान आर्मी कॅम्पवर 2018 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जाणारा लष्कराचा दहशतवादी ख्वाजा शाहिद हा पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीर (PoJK) मध्ये मृतावस्थेत आढळून आला. ख्वाजा शाहिदचे अपहरण झाल्याच्या वृत्तानंतर काही दिवसांनी त्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता. गेल्या महिन्यात, जैश प्रमुख मसूद अझहरचा विश्वासू दाऊद मलिक याची उत्तर वझिरीस्तानमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केली होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news