Italy News | इटली सरकारने निळ्या खेकड्यांना हटवण्यासाठी मोजले तब्बल ‘इतके’ कोटी रूपये

Italy News
Italy News
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : इटलीत निळ्या खेकड्यांची संख्या खूप वाढली आहे. पश्चिम अटलांटिकचे मूळ असलेले हे निळे खेकडे देशाच्या खाडीकिनारी पसरले आहेत. यामुळे क्लॅम्सच्या उत्पादनाला मोठा धोका निर्माण झाल्याने याचा परिणाम इटलीतील प्रसिद्ध डिश इटालियन पास्तावरही याचा परिणाम झाला आहे. म्हणून इटली सरकारने निळ्या खेकड्यांना हटवण्यासाठी तसेच त्याचा बंदोबस्त करण्यासाठी तब्बल २६ कोटी रूपये (Italy News) मोजले आहेत.

इटलीत निळ्या खेकड्याची प्रजाती वाढल्याने क्लॅम उद्योगाला ब्लू क्रॅब 'आक्रमणा पासून धोका निर्माण झाला आहे. ही विशेषतः आक्रमक खेकड्याची प्रजाती स्थानिक शेलफिश, फिश रो आणि इतर जलचरांची शिकार करत आहे, असेही वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

Italy News : इटलीत अचानक कशी वाढली निळ्या खेकड्यांची प्रजाती

निळे खेकडे सामान्यतः पश्चिम अटलांटिक समुद्रात आढळतात, परंतु अलिकडच्या वर्षांत इटलीच्या किनारपट्टीवर आणि अनेक उथळ पाण्याच्या भागात किंवा तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात निळे खेकडे पसरले आहेत. हे खेकडे स्थानिक मासे आणि ऑयस्टरची शिकार करतात, ज्यामुळे इटलीमध्ये सीफूडची कमतरता निर्माण होते. तसेच, ऑयस्टरचा वापर एका प्रसिद्ध इटालियन डिशमध्येही केला जातो. निळ्या खेकड्यांमुळे ऑयस्टरच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि निळ्या खेकड्यांनी सुमारे ९० टक्के तरुण ऑयस्टर खाल्ले आहेत. असे मानले जाते की जर निळ्या खेकड्यांना लवकरच नियंत्रणात आणले नाही तर ऑयस्टर्स लवकरच इटलीतून गायब (Italy News) होऊ शकतात.

ही प्रजाती वाढण्यामागे हवामान बदल हे कारण असू शकते?

इटलीच्या समुद्रात निळे खेकडे येण्याचे आणि त्यांची संख्या वाढण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे मानले जाते की निळे खेकडे समुद्री जहाजांसह इटलीमध्ये आले आणि येथे त्यांचे प्रजनन वेगाने झाले. हवामानातील बदल हे निळ्या खेकड्यांच्या जलद प्रजननाचे कारण असल्याचे मानले जात आहे. यामुळेच इटालियन सरकारने आपल्या देशातील मच्छिमारांना जास्तीत जास्त निळे खेकडे पकडण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांची संख्या आटोक्यात आणता येईल. इटालियन मच्छिमार संघटनेच्या नेत्याने सांगितले की, आता इटलीमध्ये दररोज १२ टन निळे खेकडे पकडले जात आहेत, परंतु तरीही त्यांची संख्या नियंत्रित (Italy News) केली जात नाही, असे त्याने म्हटले आहे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news