पूर्वीच्या एका प्रकरणात मीनानाथ कराळे या कर्मचार्याला निलंबित करण्यात आले होते. सध्या त्याची नाशिक येथे बदली केली आहे. मोबाईल प्रकरणाबाबतचा अहवाल अद्याप पुणे पोलिसांकडून प्राप्त झालेला नाही, अहवाल मिळताच योग्य ती कारवाई संबंधित कर्मचार्यावर करण्यात येणार आहे.
– सुनील ढमाळ, कारागृह अधीक्षक, येरवडा.
कारागृहाचे अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी येरवडा कारागृहातील मोबाईल प्रकरणाची गंभीर दखल घेऊन काही तत्कालीन अधिकारी आणि कर्मचार्यांची थेट उचलबांगडी केली. तसेच अंतर्गत सुरक्षेत वाढ करून कर्मचार्यांना देण्यात येणार्या अंतर्गत कर्तव्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रत्येक जेलसाठी एक सुरक्षा अधिकारी नेमण्यात आला आहे. दक्षता पथके तैनात करण्यात आली आहेत.
– डॉ. जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक कारागृह.