पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध पॉप सिंगर निक जोनास सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. प्रियांकाची मुलगी मालती १०० दिवसांनी आयसीयूतून सुखरूप परतल्याने निकला खूपच आनंद झाला आहे. तर सध्या निकने मुलगी मालतीसोबत जुनी गाणी गात असल्याचा खुलासा केला आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास दोघेजण मालतीवर खूप प्रेम करतात. मालती अवघ्या चार महिन्यांची असून १०० दिवसांनी आयसीयूतून सुखरूप घरी परतली आहे. मालतीच्या आगमनाने जोनास कुटुंबीय उत्साहित झाले आहेत. सध्या सर्वजण मालतीची योग्य ती काळजी घेत आहेत. याच दरम्यान निक आपल्या लाडक्या लेकीसोबत गाणे गात असल्याचे सांगितले आहे.
सिंगर निक जोनासने नुकतेच दिलेल्या एक मुलाखतीत मालतीसोबत जुनी गाणी म्हणजे, शास्त्रीय संगीत म्हणायला आवडत असल्याचे सांगितले आहे. 'तिच्यासाठी अंगाई म्हणताना आम्ही जुनी आणि शास्त्रीय गाणी गातो. मालतीची आई आणि माझी पत्नी प्रियांका चोप्रा आयपॉडवर संगीत वाजवते. यात निकचा मोठे भाऊ केविन आणि जो यांचाही समावेश होत असतो. मालतीच्या आगमनाने जोनास कुंटुंबीय आनंदात असल्याचेही निकने यावेळी म्हटले आहे.
याआधी मदर डेला निक आणि प्रियांकाने मालतीसोबतचा सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. यात ती १०० दिवसांनी आयसीयूतून सुखरूप घरी परतल्याची माहिती दिली होती. फोटोत प्रियांकाने मालतीला कुशीत घेतल्याचे दिसते. तर निकने यावेळी मालतीचा एक हात हातात धरल्याचे पाहायला मिळतेय. यावरून दोघांनी मालतीचे आनंदाने स्वागत केल्याचे दिसून येते.
हेही वाचलंत का?