
पुढारी ऑनलाईन डेस्क
एका मुलीची आई बनलेल्या अनुष्का शर्माने आता पुन्हा 'कमबॅक' केलं आहे. यापूर्वी ती 'झिरो' चित्रपटात शेवटची दिसली होती. शाहरूख खान आणि कॅटरिना कैफसमवेतचा तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर भुईसपाट झाला होता. त्यानंतर अनुष्का रूपेरी पडद्यापासून दूरच होती. आता तिचा झुलन गोस्वामीचा बायोपिक असलेला 'चकदा एक्स्प्रेस' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार आहे. नुकतीच करण जोहरची 50 व्या वाढदिवसानिमित्त शानदार पार्टी झाली व त्यामध्ये अख्खे बॉलीवूड लोटले होते. (अर्थातच कंगनाशिवाय!) त्यामध्ये अनुष्काने परिधान केलेल्या हॉट पोशाखातील तिचे फोटो आता सोशल मीडियात झळकत आहेत. अनेक सेलिबि—टींपासून ते चाहत्यांपर्यंत अनेकांनी तिच्या या फोटोंवर कमेंटस् केल्या आहेत. कन्येचा जन्म व तिचे संगोपन करीत असतानाच ती आता पूर्वीसारखीच स्लिम झाली असल्याचे यामधून दिसून येते!