Israel-Hamas War : इस्रायलच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय वंशाच्या 2 महिला सैनिकांचा मृत्यू

इस्रायलच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला सैनिकांचा मृत्यू
इस्रायलच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय वंशाच्या महिला सैनिकांचा मृत्यू
Published on
Updated on

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्‍तसेवा इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास Israel-Hamas War यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा आज 10 वा दिवस आहे. दरम्यान, या युद्धात भारतीय वंशाच्या दोन महिला सैनिकांचाही मृत्यू झाल्याची बातमी आता समोर आली आहे. 7 ऑक्टोबर रोजी घडलेल्‍या घटनेच्या वेळी या दोन्ही महिला सैनिक दक्षिण इस्रायलमध्ये उपस्थित होत्या. इस्रायलच्या लष्कराने तसेच इस्रायलच्या भारतीय समुदायानेही याची पुष्टी केली आहे.

हमासच्या हल्ल्यात शहीद झालेल्या महिला सैनिकांमध्ये (22 वर्षीय) लेफ्टनंट आणि मोसेस (Lieutenant Or Moses) आणि इन्स्पेक्टर किम डोक्राकर (Kim Dokraker) आहेत. ऑर मोसेस होम फ्रंट कमांडमध्ये तैनात होत्‍या, तर किम डोक्राकर सीमा पोलिस कार्यालयात तैनात होती. 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्‍या हल्ल्यात कर्तव्यावर असताना या दोघींचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत हमाससोबतच्या Israel-Hamas War युद्धात २८६ सैनिक आणि ५१ पोलीस अधिकारी शहीद झाले आहेत.

इस्रायलच्या भारतीय समुदायाचे म्हणणे आहे की, भारतीय वंशाच्या मृत लोकांची संख्या वाढू शकते, कारण आत्तापर्यंत इस्रायलमधील अनेक लोकांचे हमासने Israel-Hamas War अपहरण केले आहे, त्यापैकी काहींची अद्याप ओळख पटलेली नाही. शहाफ टॉकर ही भारतीय वंशाची (२४ वर्षीय) महिला ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावली होती. या हल्ल्यातून बचावलेला शहाफ आणि तिचा मित्र यानीर यांनी या हल्ल्याबाबत एजन्सीशी संवाद साधला.

शहाफ आणि तीचा मित्र यानीर यांना धक्का बसला आहे

वास्तविक, शहाफचे आजोबा याकोव टॉकर (Yaacov Talker) 1963 मध्ये मुंबईहून इस्रायलला पोहोचले होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय तेथे राहतात. हल्ल्याबाबत बोलताना शहाफने सांगितले की, ती आणि तीचा मित्र यानीर अजूनही शॉकमध्ये आहेत. शहाफने सांगितले की, ७ ऑक्टोबरला ती तिचा मित्र यानिरसोबत दक्षिण इस्रायलमध्ये Israel-Hamas War आयोजित एका पार्टीला गेली होती. यावेळी अचानक आकाशातून रॉकेटचा वर्षाव होत असल्याचे त्यांनी पाहिले.

पोलिसांनी जिथे जायला सांगितले त्‍याच्या दुसऱ्या बाजुला आम्‍ही पळालो..

शहाफने सांगितले की, मी यानिरला सांगितले की आकाशातून क्षेपणास्त्रे पडत आहेत. यानंतर आम्ही गाडीकडे धावू लागलो. धावत असताना माझा पाय घसरला आणि मी जमिनीवर पडलो. यानिरने मला उचलले आणि सांगितले की, सर्व काही ठीक आहे, परंतु आम्हाला लवकरच येथून पळावे लागेल. Israel-Hamas War आम्ही गाडीत बसलो आणि गाडी चालवू लागलो. पोलिसांनी आम्हाला उजवीकडे पळायला सांगितले, पण तो रस्ता तेल अवीवच्या दिशेने गेला नाही, म्हणून आम्ही मागे वळून तेल अवीवच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला.

21 हून अधिक लोक 3 तास पेट्रोल पंपावर लपून बसले

ते पुढे म्हणाले की, आम्ही वाचणार की मरणार हे आम्हाला माहीत नव्हते. दहशतवादी पूर्ण नियोजन करून पलायनाची वाट पाहत होते. आठ दहशतवाद्यांनी रस्ता अडवला होता. दहशतवाद्यांनी त्यांना पाहताच त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यानंतर यानिरने कार पाठिमागे घेतली आणि दुसऱ्या बाजुने पळ काढला, मात्र येथेही दहशतवादी Israel-Hamas War हजर होते. कसेबसे दोघेही त्यांच्यापासून निसटले आणि एका गॅस स्टेशनवर (पेट्रोल पंप) पोहोचले आणि तीन तास घाबरून तिथे लपून राहिले. त्याच्यासोबत आणखी २१ जण तेथे उपस्थित होते. एकच सुरक्षा रक्षक होता ज्याकडे बंदूक होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news