पुढारी ऑनलाईन डेस्क : ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा एक भाग म्हणून हमासने सर्वसमावेशक युद्धविरामाचा प्रस्तावाचे संकेत दिले असतानाच इस्रायल सैन्य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात वृत्त 'टाईम्स ऑफ इस्रायल'ने दिले आहे.
नेतान्याहू यांनी म्हटलं आहे की, " इस्रायल हमासच्या मागण्यांना सहमती देणार नाही. आम्ही अशी परिस्थिती कोणतीही अट स्वीकारण्यास तयार नाही. हमास बटालियन त्यांच्या बंकरमधून बाहेर पडतील, गाझावर पुन्हा ताबा मिळवतील. ते त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करतील.जोपर्यंत सर्व उद्दिष्टे साध्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही लढा सुरुच ठेवू."
नेतन्याहू यांनी चर्चेसाठी शिष्टमंडळ न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, हमासचे नेते इस्माईल हनीयेह यांनी शुक्रवारी (दि.४ मे) म्हटलं होतं की, आम्ही सर्वसमावेशक युद्धविरामापर्यंत पोहोचण्यास उत्सुक आहे. इस्रायलने गाझामधून माघार घेण्याची हमी देणे आवश्यक आहे. तरच आम्ही पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात ओलीसांची सुटका करु."
हेही वाचा :