अमेरिकेने इस्‍त्रायलवर डोळे वटारले; नेत्‍याहून म्‍हणाले, "आमचे जवान..." | पुढारी

अमेरिकेने इस्‍त्रायलवर डोळे वटारले; नेत्‍याहून म्‍हणाले, "आमचे जवान..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्‍त्रायल-हमास संघर्षातत एकीकडे अब्‍जावधी डॉलरची मदत करणार्‍या अमेरिकेने आता इस्रायलच्या लष्करी बटालियनवर निर्बंध लादण्याची तयारी करत आहे. पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध बटालियनने केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी हे निर्बंध लादले जातील, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे. मात्र या कारवाईचा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी निषेध केला आहे.
अमेरिका नेत्झा येहुदा बटालियनवर बंदी घालण्याची शक्‍यता
अमेरिकन काँग्रेसने इस्रायलसाठी 13 अब्ज डॉलरची नवीन लष्करी मदत मंजूर केली आहे. तर आता अमेरिका इस्रायलच्या लष्करी बटालियनवर निर्बंध लादण्याची तयारी करत आहे. पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध बटालियनने केलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनासाठी हे निर्बंध लादले जाऊ शकतात. इस्रायली सैन्यावर पॅलेस्टाईनच्या वेस्ट बँकमध्ये गंभीर मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. अशा स्थितीत तेथील नागरिकांना लक्ष्य केल्याबद्दल अमेरिका आता नेत्झा येहुदा बटालियनवर बंदी घालण्याची घोषणा करू शकते. असे झाल्यास, इस्रायली लष्करी तुकडीवर ज्‍यो बाडयन प्रशासनाची ही पहिली कारवाई असेल.
बटालियनवर निर्बंध लादण्याचा हेतू मूर्खपणाचा : पंतप्रधान नेतन्याहू
अमेरिकेच्या या संभाव्य पाऊलामुळे इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू चांगलेच भडकले आहेत. यासंदर्भात बोलताना शनिवारी रात्री म्हणाले, ‘इस्रायली संरक्षण दलांवर निर्बंध लादले जाऊ नयेत. आमचे जवान दहशतवाद्यांशी लढत आहेत. नेत्झा येहुदा बटालियनवर निर्बंध लादण्याचा हेतू मूर्खपणाचा आहे. माझ्या नेतृत्वाखालील इस्रायली सरकार या उपायांविरुद्ध प्रत्येक संभाव्य मार्गाने कारवाई करेल. याआधी अमेरिकेने इराणवर इस्रायलवर अनेक प्रकारे निर्बंध लादले आहेत. इस्रायलविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्‍याचे नेतन्‍याहू यांनी म्‍हटले आहे.
आपल्या सैनिकांवर निर्बंध हे धोक्याचे लक्षण
इस्रायलचे मंत्री इटामार बेन ग्विर आणि बेझालेल स्मोट्रिच यांनीही अमेरिकेच्या निर्णयावर जोरदार टीका केली. “आमच्या सैन्यावर निर्बंध लादणे हे धोक्याचे लक्षण आहे,” ग्वीर म्हणाले. “हे पाऊल अत्यंत गंभीर आहे आणि नेत्झा येहुदा सदस्यांना संरक्षित केले पाहिजे.”
इस्रायली मंत्री इटामार बेन ग्विर आणि बेझालेल स्मोट्रिच यांनीही संरक्षण मंत्री योव गॅलंट यांना अमेरिकन आदेशांपुढे न झुकण्याचे आवाहन केले. अर्थमंत्री बेझालेल स्मोट्रिच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका निवेदनात नेत्झा येहुदावर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्‍या योजनेच्या विरोधात कठोर भूमिका घेतली.

Back to top button