Israel-Hamas War : हमास पाठोपाठ लेबनॉनचाही इस्रायलवर हल्ला!, युद्धात आतापर्यंत मृतांचा आकडा ५५६ वर

दहशतवादी संघटना हमास पाठोपाठ आता लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्‍यात आला आहे,
दहशतवादी संघटना हमास पाठोपाठ आता लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्‍यात आला आहे,

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दहशतवादी संघटना हमास पाठोपाठ आता लेबनॉनमधूनही इस्रायलवर रॉकेट हल्ला करण्‍यात आला आहे, असे वृत्त 'एपी' वृत्तसंस्‍थेने दिले आहे. आज लेबनॉनमधील हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेने इस्रायलच्या तीन ठाण्यांवर रॉकेट हल्ला केला. सीरिया आणि इस्रायल सीमेदरम्यान गोलान हाइट्सजवळ हे हल्ले करण्यात आले. (Israel-Hamas War )

प्रत्युत्तर दाखल इस्रायलचे लेबनॉनवर हवाई हल्ले

हमास आणि इस्रायल यांच्यात शनिवारी सुरू झालेले युद्ध दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. रविवारी झालेल्या युद्धात आपले २६ सैनिक मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. आज सकाळी लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाहनेही इस्रायलवर मोर्टार हल्ला केला. प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने लेबनॉनवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.

हमासने शनिवारी इस्रायलवर ५ हजार रॉकेटने हल्ला केला होता. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी गाझा सीमेवर तैनात इस्त्रायली संरक्षण दलाचा कमांडर नहल ब्रिगेड आणि त्याच्या 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. 256 पॅलेस्टिनीही मारले गेले आहेत. इस्रायलमध्ये 1,864 आणि पॅलेस्टाईनमध्ये 1,700 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

येथे, इस्रायली संरक्षण दलाचे प्रवक्ते जोनाथन कॉन्रिकस यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यात हमासने महिला आणि मुलांसह सुमारे 200 इस्रायली लोकांना ओलीस ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यांना गाझाकडे नेण्यात आले आहे. हा आकडाही वाढण्याची भीती जोनाथन यांनी व्यक्त केली.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news