पुढारी ऑनलाईन डेस्क : मला वाटते शरद पवार हे सुप्रिया सुळे यांना हमास या दहशतवादी संघटनेसाेबत लढण्यासाठी गाझाला पाठवतील, अशी बाेचरी टीका करणारे आसामचे मुख्यमंत्री आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सडेताेड प्रत्युत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे की, 'मला आश्चर्य वाटते कारण हिमंता बिस्वा सरमा यांचाही माझ्यासारखाच डीएनए आहे. तो काँग्रेसचा आहे. आम्हा दोघांमध्ये काँग्रेसचा डीएनए आहे. तुम्हाला माहिती आहे की, भाजपचे वर्तन महिलांबाबत अन्यायकारक आहे; पण हिमंता बिस्वा सरमा यांची महिलांबद्दलची विचारसरणी कशी बदलली याचे मला आश्चर्य वाटते. त्यांच्यावर भाजपचा बराच प्रभाव पडल्याचे दिसते. भाजपच्या आयटी सेलने आधी शरद पवार काय म्हणाले हे समजून घ्यावे आणि त्यांचे (शरद पवार) संपूर्ण विधान ऐकावे, असे आवाहनही त्यांनी केले.
शरद पवारांच्या या वक्तव्याचा भाजपच्या अनेक नेत्यांनी निषेध केला. यामध्ये पियुष गोयल, नितीन गडकरी या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, 'मला वाटते शरद पवार सुप्रियाला हमासशी लढण्यासाठी गाझाला पाठवतील.' " यावेळी त्यांनी पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये गेलो आहे. भाजपचे कार्यकर्ते जमिनीवर चांगले काम करत आहेत. आम्ही सहज जिंकू. काँग्रेस नेते राहुल गांधींकडे कोणतीही पात्रता नाही. ते केवळ घराणेशाहीमुळे राजकारणात आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
Israel-Palestine conflict : शरद पवार काय म्हणाले होते ?
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयींपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात (Israel-Hamas War) पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका घेतली. पॅलेस्टाईनला मदत करण्याच्या भूमिकेत बदल झाला नव्हता. आता मात्र वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसची स्वच्छ भूमिका ही पॅलेस्टाईनच्या समर्थनाची असल्याचे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट केले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलची बाजू घेणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले होते.
हेही वाचा :