पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर (Israel Iran Tension) रविवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला इराणचे राजनैतिक अधिकारीही उपस्थित होते. बैठकीत इराणच्या राजदूत इस्रायलवरील हल्ल्याचा बचाव करत त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नसल्याने हल्ला केल्याचे स्पष्टीकरण दिले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील इराणचे राजदूत अमीर सईद एरवानी म्हणाले की, 'इराणच्या इस्लामिक रिपब्लिकने स्वसंरक्षणाच्या अधिकाराखाली इस्रायलवर हल्ला केला. इस्रायलने दमास्कसमधील इराणी दूतावासावर हल्ला केल्यानंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आपले कर्तव्य बजावण्यात अपयशी ठरली. अशा परिस्थितीत कोणताही पर्याय उरला नाही आणि त्याला प्रत्युत्तर द्यावे लागले. इराणच्या राजदूतांनी असेही म्हटले आहे की, 'इराणला संघर्ष वाढू द्यायचा नाही, परंतु कोणतीही आक्रमक कारवाई केली तर त्याला प्रत्युत्तर दिले जाईल.' (Israel Iran Tension)
इस्रायलच्या राजदूताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत इराणवर गंभीर आरोप केले. तेथील अशांततेसाठी इराणला जबाबदार धरले आहे. इराणचा मुखवटा गळून पडला आहे, तो जगभरातील दहशतवादाला खतपाणी घालतो असे इस्रायलचे राजदूत म्हणाले. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सला दहशतवादी संघटना घोषित करावे. इराणवर कठोर निर्बंध लादावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Israel Iran Tension)
हेही वाचा :