पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायलने आज (दि.१२) पहाटे हवाई हल्ले करुन रफाहमध्ये दोन इस्रायली ओलीसांची सुटका केली.दक्षिण गाझा शहरात झालेल्या या हवाई हल्ल्यात ३७ नागरिक ठार झाल्याचे वृत्त 'आयएएनएस'ने दिले आहे. फर्नांडो मारमन (वय ६०), लुई हेरे (वय ७०) अशी सुटका करण्यात आलेल्याची नावे असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटलं आहे.
७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. यावेळी फर्नांडो आणि लुई यांचे किबुत्झ नीर यित्झाक येथून अपहरण केले होते. आजच्या कारवाईसंदर्भात माहिती देताना इस्त्रायली लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल रिचर्ड यांनी सांगितले की, " आज करण्यात आलेली कारवाई ही गुंतागुंतीचे होती. यासाठी मागील काही दिवस आम्ही काम करत होतो. योग्य परिस्थितीची वाट पाहत होतो. ओलिसांना एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आले होते. इस्रायलच्या सैन्याने धडक कारवाई करत ओलिसांची सुटका केली. यावेळी लष्कराच्या जवानांसह ओलिसांना बाहेर काढण्यासाठी हवाई हल्ला करण्यात आला."
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने असे म्हटले आहे की, सैन्याला रफाह रिकामी करण्यासाठी आणि तेथे तैनात असलेल्या हमासच्या चार बटालियन नष्ट करण्यासाठी योजना विकसित करण्याचे आदेश दिले आहेत. हमासच्या अतिरेक्यांनी दक्षिण इस्रायलमध्ये 1,200 लोक मारले आणि 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात किमान 250 लोकांचे अपहरण केले होते. इस्रायली उंच. इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या लष्करी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे ज्यात 28,000 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत, असे हमासच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
हेही वाचा :