रक्‍तरंजित संघर्ष आणखी चिघळणार..! हमासच्‍या बोगद्यात सापडले पाच ओलिसांचे मृतदेह, गाझावरील हल्‍ल्‍यात ७८ ठार

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढरी ऑनलाईन डेस्‍क : गाझा शहरातील हमासच्‍या एका मोठ्या बोगद्यात इस्‍त्रायलच्‍या पाच ओलिसांचे मृतदेह सापडले आहेत, असे वृत्त 'द इस्रायल टाईम्स'ने दिले आहे. दरम्‍यान, रविवार दि. २४ डिसेंबर रोजी इस्रायलच्‍या हवाई हल्ल्यात गाझा शहरातील निर्वासित शिबिरावर केलेल्‍या हवाई हल्‍ल्‍यात ७८ नागरिक ठार झाले आहेत. ( Israel finds 5 hostages' bodies )

Israel hostages : उत्तर गाझातील बोगद्यात सापडले इस्रायलच्‍या ओलिसांचे मृतदेह

उत्तर गाझामधील हमासच्या भूमिगत बोगद्याच्या पाच इस्रायली ओलिसांचे मृतदेह इस्‍त्रायलच्‍या सैनिकांना सापडले आहेत. दरम्‍यान, पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते अश्रफ अल-किद्रा यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, गाझा निर्वासित शिबिरात ठार झालेल्या 78 जणांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश आहे. हमासने एका निवेदनात हवाई हल्ल्याला भयंकर नरसंहार आणि नवा युद्ध गुन्हा म्हटले आहे.

हमासने अजूनही १०० हून अधिक ओलीस ठेवल्‍याचे दावा इस्‍त्रायलने केला आहे. मागील युद्धविराम करारानुसार, हमासने 105 ओलिसांची सुटका केली तर इस्रायलने 200 हून अधिक पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली होती.७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी पॅलेस्‍टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने इस्‍त्रायलवर भीषण हल्‍ला केला होता. याला तितक्‍याच सडेतोड इस्‍त्रायलने प्रत्‍युत्तर दिले. मागील दोन महिन्‍यांहून अधिक काळ सुरु असणार्‍या रक्‍तरंजित संघर्षात आतापर्यंत 20,400 पॅलेस्टिनी तर इस्रायलमध्ये सुमारे 1,200 नागरिक मृत्‍युमुखी पडले आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news