Israel-Hamas War News | गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम, ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल- हमासमध्ये करार

Israel-Hamas War News | गाझामध्ये ४ दिवस युद्धविराम, ५० ओलिसांच्या सुटकेसाठी इस्रायल- हमासमध्ये करार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : इस्रायलच्या मंत्रिमंडळाने गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या ५० जणांची सुटका करण्यासाठी हमाससोबतच्या समझोता कराराला मंजुरी दिली आहे. तसेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमाससोबतच्या ४ दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता दिली आहे. यामुळे ५० ओलिसांची सुटका करण्यात येणार आहे. चार दिवसांच्या युद्धविरामादरम्यान ओलिसांची सुटका केली जाईल, असे इस्रायली पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Israel-Hamas War News)

संबंधित बातम्या 

या समझोता करारानुसार, प्रत्येक अतिरिक्त १० ओलिसांची सुटका केल्यास युद्धविरामाचा कालावधी एका दिवसाने वाढवला जाईल. बुधवारी पहाटे झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्रायलच्या मंत्रिमंडळाने या कराराला मंजुरी दिली. या बैठकीपूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israeli Prime Minister Benjamin Netanyahu) म्हणाले की, ओलिसांच्या सुटकेबाबत समझोता झाला तरीही युद्ध सुरूच राहील.

दरम्यान, पॅलेस्टिनी माहिती केंद्राने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की ५० ओलिसांना इस्रायली तुरुंगात ठेवलेल्या १५० पॅलेस्टिनी महिला आणि मुलांच्या बदल्यात सोडले जाईल. हमासच्या म्हणण्यानुसार, या समझोत्यामुळे मानवतावादी मदत, वैद्यकीय पुरवठा आणि इंधन वाहून नेणारे शेकडो ट्रकांचा गाझामध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवेदनात असेही म्हटले आहे की युद्धविराम दरम्यान गाझामध्ये कोणावरही हल्ला किंवा अटक करणार नाही, असे इस्रायलकडून सांगण्यात आले आहे.

७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी सीमा ओलांडल्यानंतर इस्रायलवर हल्ले केले. यात १,२०० लोक ठार झाले आणि सुमारे २४० लोकांना ओलीस ठेवले. याला चोख प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने गाझावर हल्ले केले. यात मोठी जीवितहानी झाली आहे. ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांनी दहशतवादी गट मानलेल्या हमासने ७ ऑक्टोबर रोजी केलेल्या क्रूर हल्ल्यादरम्यान इस्रायलमधून सुमारे २४० लोकांचे अपहरण केले होते आणि त्यांना ओलीस ठेवले. (Israel-Hamas War News)

गाझामध्ये हमास चालवत असलेल्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, इस्रायलच्या हल्ल्यात १४ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यात ५ हजारांहून अधिक मुलांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news