Israel and Palestine War Update : गाझा पट्ट्यात आतापर्यंत ८ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार

Israel and Palestine War Update
Israel and Palestine War Update

पुढारी ऑनलाईन डेस्क: पॅदहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबरला हल्ला केला. यानंतर हमास- इस्रायल युद्ध पेटले आहे. इस्रायल सरकारने युद्धापासून माघार घेण्यास नकार दिला आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीतील हल्ले आणखी तीव्र केले असून, आतापर्यंत गाझा पट्ट्यातील ८ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी या हल्ल्यात ठार झाले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली असल्‍याचे वृत्त 'द असोसिएटेड प्रेस'ने दिले आहे. (Israel and Palestine War Update)

'एपी'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गेल्या तीन आठवड्यांपासून हमास आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्रायलने गाझा पट्टीतील उत्तर भागात जमिनीवरील कारवाया वाढवल्या आहेत. हमास दहशतवाद्यांची तळे भूमिगत आहेत. त्यामुळे इस्रायल सैन्याने गाझा शहरातील भूमिगत लक्ष्यांसह हल्ले तीव्र केले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या हमास -इस्रायल संघर्षातील मृतांची संख्या ही आठ हजारांच्या पुढे पोहचली असून, यामध्ये बहुतेक महिला आणि अल्पवयीन आहेत, असा दावा गाझा आरोग्य मंत्रालयाने केला आहे. (Israel and Palestine War Update)

बहुतेक ठिकाणची इंटरनेट सेवा पूर्ववत : पंतप्रधान नेतन्याहू

इस्रायल आणि हमास यांच्यातील गाझा पट्टीतील युद्ध 23 व्या दिवशी (रविवार) वाढतच आहे. माध्यमांशी बोलताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, गाझा प्रदेशात व्यापक जमिनीवर आक्रमण करण्यापूर्वी युद्ध तीव्र होईल. इस्रायल सर्व ओलीसांना परत आणण्यासाठी कटिबद्ध आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून गाझा पट्टीतील इंटरनेट आणि मोबाईल सेवा बंद करण्यात आली होती, परंतु गाझा शहरातील बहुतेक ठिकाणची इंटरनेट सेवा आज पूर्ववत करण्यात आली आहे. असे देखील नेतन्याहू यांनी सांगितले.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news