Top 10 Universities in India 2023: भारतातील टॉप १० विद्यापीठांच्या यादीत आयएससी बंगळूर विद्यापीठ पहिले; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून यादी जाहीर

Top 10 Universities in India 2023: भारतातील टॉप १० विद्यापीठांच्या यादीत आयएससी बंगळूर विद्यापीठ पहिले; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून यादी जाहीर

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या एनआयआरएफ (NIRF) रँकिंगनुसार (Top 10 Universities in India 2023) आयएससी (ISC) बंगळूर विद्यापीठ सर्वोत्तम ठरले आहे. त्यानंतर जेएनयू (JNU) आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. शिक्षण आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री राजकुमार रंजन सिंह यांनी आज (दि.५) राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग 2023 ची यादी जाहीर केली.

Top 10 Universities in India 2023 : ही आहेत भारतातील टॉप 10 विद्यापीठे –

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली (जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली)

जामिया मिलिया इस्लामिया, नवी दिल्ली

जाधवपूर विद्यापीठ कोलकाता

बनारस हिंदू विद्यापीठ, वाराणसी

मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल

अमृता विश्व विद्यापीठम, कोईम्बतूर

वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, वेल्लोर

अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलीगढ

हैदराबाद विद्यापीठ, हैदराबाद

कृषी आणि संलग्न क्षेत्रे' श्रेणीतील टॉप 3 संस्था

भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली
नॅशनल डेअरी इन्स्टिट्यूट, कर्नाल
पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना

भारतातील टॉप 3 कायदा संस्था

NLU बेंगळुरू
NLU दिल्ली
नलसर, हैदराबाद

दरम्यान, २022 मध्ये यादीत फक्त चार श्रेणी होत्या. एकूण, महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्था यामध्ये अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कायदा, वैद्यकीय, वास्तुकला आणि दंतवैद्य यांचा समावेश होता. मात्र, यावर्षी NIRF ने नवीन कृषी आणि संलग्न क्षेत्र या शाखेचा समावेश केला आहे. याशिवाय, आर्किटेक्चर शाखेचे नाव बदलून 'आर्किटेक्चर अँड प्लॅनिंग' असे करण्यात आले आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news