पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग चारचाकीवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग चारचाकीवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी नाही

येरवडा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : येरवडा परिसरातील गाडीतळ येथे गुरुवारी मेट्रो स्टेशनचे काम सुरू असताना नगर रोडवरून जाणार्‍या मोटारीवर लोखंडी पाईप कोसळला. यात या मोटारीचे नुकसान झाले आहे. सुदैवाने मोटारचालकाला कोणतीही दुखावत झाली नाही. मेट्रो स्टेशनखाली पीएमपीचा बसस्टॉप असून, या ठिकाणी प्रवाशांची नेहमी गर्दी असते. दैव बलवत्तर म्हणून हा पाईप कारवर पडल्याने नागरिकांचा जीव वाचला.

याबाबत माजी नगरसेविका अश्विनी लांडगे, सामाजिक कार्यकर्ते डॅनियल लांडगे यांनी घटनास्थळी जाऊन याबाबत मेट्रोच्या प्रशासनाला तत्काळ माहिती दिली. डॅनियल लांडगे म्हणाले,'मेट्रोचे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशी खबरदारी घेतली जात नाही. हे काम मुख्य रस्त्यावर सुरू असल्याने परिसरात संरक्षणात्मक जाळ्या लावणे गरजेचे आहे. हा पाईप खालून जाणार्‍या नागरिकांच्या डोक्यात कोसळला असता, तर मोठी दुर्घटना झाली असती.' लांडगे यांनी येरवडा पोलिसांशी संपर्क साधून सुरक्षाविषयक पुरेशा उपाययोजना केल्या नसल्याने मेट्रो प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news