IRCTC Down : प्रवाशांना फटका! रेल्वेची तिकीट बुकिंग सेवा १० तासांपासून बंद

Indian Railway
Indian Railway

पुढारी ऑनलाईन : भारतीय रेल्वेची बुकिंग करण्यात येणारी वेबसाईट काही तांत्रिक बिघाड झाल्याने बंद आहे. त्यामुळे गेल्या दहा तासांपासून रेल्वे तिकीट बुकिंगची वेबसाईट आणि अॅप सेवा पूर्णपणे  बंद आहे. दरम्यान, रेल्वेची टेक्निकल टीम या समस्येचे निराकरण करत असल्याचे रेल्वे माहिती प्रणाली केंद्राकडून सांगण्यात आले आहे. या टेक्निकल समस्येची पुष्टी रेल्वेच्या (IRCTC Down) अधिकृत ट्विटर हँडेलवरून करण्यात आली आहे.

सध्या इंडियन रेल्वे वेबसाईटवर तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वेची तिकीट सेवा तात्पुरती उपलब्ध नाही. दरम्यान आमची तांत्रिक टीम समस्येचे निराकरण करत असून, तांत्रिक समस्या दूर होताच आम्ही सूचित करू, असे देखील आयआरसीटीसीने केलेल्या ट्विटमध्ये (IRCTC Down) म्हटले आहे.

IRCTC Down: रेल्वे तिकीट बुकसाठी पर्यायी व्यवस्था

पर्यायी Amazon, Makemytrip इत्यादी इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे तिकिटे बुक केली जाऊ शकतात, असे देखील IRCTC ने केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

अतिरिक्त खिडक्या सुरू करणार

रेल्वेची वेबसाईट आणि अॅप सेवा बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आम्ही विविध रेल्वे स्थानकांवर अतिरिक्त/अतिरिक्त PRS (प्रवासी आरक्षण प्रणाली) तिकीट खिडक्या उघडत आहोत. प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news