पुढारी ऑनलाईन डेस्क :
इंडियन प्रिमियम लीगच्या ( आयपीएल ) २०२२ हंगामात नवीन नियमानुसार होणार आहे. डीआरएस, झेलबाद आणि रन आउटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. ( IPL Rules Change ) तसेच कोरोनाच्या प्रादूर्भावाचे संकट कायम असल्याने सामन्यांच्या वेळापत्रकातही बदल होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या कारणामुळे सामना रद्द झाल्यास याचा निर्णय आता तांत्रीक समिती घेणार आहे. जाणून घेवूया आयपीएलच्या नव्या नियमांविषयी….
पंचांच्या निर्णयाला आव्हान देणार्या येणार्या ( डीआरएस ) नियमातही बदल करण्यात आले आहेत. यापूर्वी दोन्ही संघांकडे चार 'डीआरएस' होते. म्हणजे एका संघाकडे दोन डीआरएस होते. यातील एक फलंदाजीवेळी तर एक गोलंदाजी करताना वापरण्याचा अधिकार होता. क्रिकबजने दिलेल्या माहितीनुसार, आता आयपीएलमध्ये आता एका डावात प्रत्येक संघाला दोन डीआरएस असणार आहेत. म्हणजे आता संपूर्ण सामन्यात एकुण आठ डीआरएस असतील. एका संघाकडे एकुण चार डीआरएसपैकी दोन फलंदाजांना तर दोन गोलंदाजांसाठी असतील.
मीडिया रिपोर्टनुसार, बीसीसीआयने आता आयपीएल २०२२ पासून एमसीसीचे सर्व नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवीन नियमानुसार फलंदाज आउट झाल्यानंतर त्याच्या जागी नवीनच खेळाडू स्ट्राइक घेईल. यापूर्वी फलंदाज झेलबाद झाल्यास खेळणारा खेळाडू हा बॉलिंग एंडवर धावत जात असे. त्यामुळे नवीन फलंदाज हा नॉन स्ट्राइकर एंडलाच थांबत असे. मात्र आता फलंदाज बाद झाला तर नवीन फलंदाजच स्ट्राइक घेणार आहे.
कोरोनाचे संकट अद्याप कायम आहे. त्यामुळे एखाद्या खेळाडूला कोरोनाची बाधा झालने संघात ११ खेळाडू (यामधील सात भारतीय खेळाडू असणे आवश्यक) मैदानात उतरु शकले नाहीत हा सामना पुन्हा होईल. मात्र हा सामना पुन्हा झाला नाही तर याबाबतचा निर्णय हा तांत्रीक समिती घेणार आहे. आयपीएलमध्ये यापूर्वी कोरोनाच्या कारणामुळे सामना रद्द झाल्यास तो पुन्हा होत नसे. तसेच रद्द झालेल्या सामन्याचे प्रत्येकी दोन गुण संबंधित संघांना दिले जात असत.
आयपीएलमध्ये प्ले ऑफमधील किंवा अंतिम सामना टाय झाला आणि सुपर ओव्हरही झाली नाही तर गुणतालिकेतील अंकांनुसार विजेता संघ घोषित होणार आहे. वास्तविक सुपर ओव्हरनंतर सामन्याचा निकाला लागतो. सुपर ओव्हर टाय होण्याची शक्यता कमी कमी असते. मात्र तसे झालं तर आता गुणतालिकेनुसार विजेता संघ घोषित केला जाणार आहे.
हेही वाचलं का?
पाहा व्हिडीओ :