IPL Media Rights : मीडिया राइट्स विकून BCCI मालामाल! 48 हजार 390 कोटींची कमाई

IPL Media Rights : मीडिया राइट्स विकून BCCI मालामाल! 48 हजार 390 कोटींची कमाई

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीसीसीआयने मंगळवारी 2023 ते 2027 दरम्यान आयपीएलचे मीडिया हक्क 48390 कोटी रुपयांना विकले आणि क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या प्रसारण करारावर स्वाक्षरी केली. भारतीय उपखंडातील टीव्ही राईट्स डिस्ने स्टारने 23 हजार 575 कोटी रुपयांना (प्रति सामना 57.5 कोटी रुपये) विकत घेतले. तर डिजिटल राईट्स रिलायन्सच्या व्हायकॉम 18 कडे 20 हजार 500 कोटी रुपयांना विकले गेले. आता आयपीएल ही प्रति सामन्याच्या किंमतीनुसार जगातील दुसरी सर्वात मोठी क्रीडा लीग बनली आहे. (IPL Media Rights)

वायाकॉमने 2 हजार 991 कोटी रुपयांना 'नॉन-एक्सक्लुझिव्ह' राईट्सचे सी पॅकेजही विकत घेतले. A आणि B पॅकेजमध्ये पुढील पाच वर्षांत 410 सामने (2023 आणि 2024 मध्ये 74-74 सामने, 2025 आणि 2026 मध्ये 84-84 सामने आणि 2027 मध्ये 94 सामने). वायाकॉमने स्टार इंडियाचे माजी प्रमुख उदय शंकर (बोधी ट्री) आणि जेम्स मर्डोक (लुपा सिस्टम्स) यांचा समावेश असलेल्या कन्सोर्टियमद्वारे बोली लावली. (IPL Media Rights)

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट केले की, 'स्टार इंडियाने 23 हजार 575 कोटी रुपयांना भारतीय उपखंडातील टीव्ही राईट्स विकत घेतल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे. कोरोना महामारीला दोन वर्षे लोटूनही बीसीसीआयच्या संघटनात्मक क्षमतेचे हे मोठे यश आहे.

पहिल्या वर्षापासून आयपीएल हा विकासाचा समानार्थी आहे. आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण दिवस आहे. कारण आयपीएलने ई-लिलावाद्वारे नवीन उंची गाठली आहे. ज्यात या स्पर्धेचे मीडिया राईट्स 48 हजार 390 कोटी रुपयांना विकले. आता आयपीएल ही प्रति सामन्याच्या किंमतीनुसार जगातील दुसरी सर्वात मोठी क्रीडा लीग बनली आहे.

प्रति सामना 118 कोटी

बीसीसीआयला आयपीएलच्या एका सामन्यासाठी 118 कोटी रुपये मिळणार आहेत. अशाप्रकारे, एका सामन्याच्या प्रसारण अधिकारानुसार, आयपीएल आता जगातील दुसरी सर्वात महागडी लीग बनली आहे. IPL ने EPl (रु. 86 कोटी प्रति सामना) वर मात केली आहे. आता फक्त अमेरिकेच्या नॅशनल फुटबॉल लीगला (NFL) यापेक्षा जास्त पैसे कमवते आहे. NFL ला प्रत्येक सामन्याच्या प्रसारण अधिकारासाठी 133 कोटी रुपये मिळतात.

या चार पॅकेजमध्ये लिलाव

ई-लिलाव चार विशिष्ट पॅकेजमध्ये आयोजित करण्यात आला. ज्यासाठी खालीलप्रमाणे बेस प्राईज ठरण्यात आली.

  • पॅकेज A : भारतीय उपमहाद्वीपसाठी टीव्ही राईट्स : 49 कोटी रुपये
  • पॅकेज B : भारतीय उपमहाद्वीपसाठी डिजिटल राईट्स : 33 कोटी रुपये
  • पॅकेज C : प्रति सीजन 18 सामन्यांसाठी डिजिटल राईट्स 11 कोटी रुपये
  • पॅकेज D : उर्वरित जगासाठी एकत्रित टीव्ही आणि डिजिटल अधिकार : 3 कोटी रुपये
  • स्टार, व्हायकॉम-18 आणि टाइम्स इंटरनेटने मिळवले मीडिया राईट्स

यांनी घेतले विकत..

  • पॅकेज A : स्टार इंडिया : 23 हजार 575 कोटी रुपये : 410 सामन्यांसाठी प्रति सामना 57.50 कोटी रुपये
  • पॅकेज B : व्हायकॉम-18 : 20 हजार 500 कोटी रुपये : 410 सामन्यांसाठी प्रति सामना 50 कोटी
  • पॅकेज C : व्हायकॉम-18 : 3 हजार 257.52 कोटी रुपये : 98 सामन्यांसाठी 33.24 कोटी रुपये प्रति सामना
  • पॅकेज D : व्हायकॉम-18 आणि टाईम्स इंटरनेट : 1 हजार 58 कोटी रुपये : 410 सामन्यांसाठी प्रति सामना 2.58 कोटी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news