पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडियन प्रीमीयर लीगच्या (IPL) यंदाच्या हंगामात आतापर्यंत सर्वात खराब कामगिरी करणारा संघ अशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ओळख झाली आहे. सात सामन्यांमध्ये सहा पराभव पचावावे लागल्याने संघाचे चाहतेही कमालीचे निराश आहेत. आता माजी क्रिकेटपटू के. श्रीकांतही संघाच्या सुमार कामगिरीवर भडकले आहेत. ( IPL 2024: K Srikkanth Says Virat Kohli Best Bowler In Bangalore )
सोमवार, १५ जानेवारी रोजी बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद आमने -सामने होते. या सामन्यात सनरायझर्सने 20 षटकांत 287/3 धावा केल्या, ही आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या ठरली.
एका यूट्यूब चॅनलशी बोलताना के. श्रीकांत म्हणाले की, "आरसीबी संघाने आता मैदानावर ११ फलंदाजानाच उतरवले पाहिजे. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात विराट कोहली चांगली गोलंदाजी करू शकला असता." ( IPL 2024: K Srikkanth Says Virat Kohli Best Bowler In Bangalore)
हैदराबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात रीस टॉपली, फर्ग्युसन यांच्यासह संघाचा सर्वोत्तम गोलंदाज विल जॅक यांनी सुमार कामगिरी केली. आता गोलंदाजाऐवजी संघाने ११ फलंदाजांनाच मैदानातावर उतरवले तर बरे होईल. कर्णधार फाफ डू प्लेसिस याला दोन षटक तर कॅमेरून ग्रीनला चार षटके द्या. मला वाटतं या सामन्यात विराट कोहलीने चार षटके टाकली असती तर त्याने इतक्या धावा दिल्या नसत्या. विराट कोहली चांगला गोलंदाज आहे. स्टेडियममधून उडणारे चेंडू पाहणाऱ्या विराट कोहलीबद्दल मला खूप वाईट वाटत होते. फलंदाजीला आल्यावर तो रागाने बाहेर पडला, असेही श्रीकांत यांनी म्हटले आहे.
आरसीबीने सनरायझर्सविरुद्ध कोणत्याही स्पेशलिस्ट फिरकीपटूला संधी दिली नाही. याशिवाय मोहम्मद सिराज यांलाही संघात स्थान देण्यात आले नाही. संघाची गोलंदाजीची फळी अननुभवी दिसत होती. विल जॅक आरसीबीसाठी ऑफ स्पिन गोलंदाजी करताना दिसला. त्याने तीन षटकात 32 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज रीस टोपली, यश दयाल, लोकी फर्ग्युसन आणि विजयकुमार वैशाक यांनी 10 षटकात 137 धावा दिल्या. सनरायझर्सने २२ षटकार ठोकले. तर आरसीबीने १६ षटकार मारले म्हणून फलंदाजांसाठी हा दिवस योग्य ठरला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने टी-20 फलंदाजीला एका नव्या उंचीवर नेले. त्याने या डावात ४१ चौकार मारले गेले.
हेही वाचा :