Robin Minz Accident : गुजरात टायटन्सने ३.६ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या खेळाडूचा अपघात

Robin Minz Accident : गुजरात टायटन्सने ३.६ कोटी रूपयांना विकत घेतलेल्या खेळाडूचा अपघात
Published on
Updated on

अहमदाबाद : वृत्तसंस्था : आयपीएल २०२४ पूर्वी गुजरात टायटन्ससाठी एक वाईट बातमी समोर येत आहे. संघाचा स्टार खेळाडू रॉबिन मिन्झचा अपघात (Robin Minz Accident) झाला आहे. आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावात गुजरातने रॉबिनला ३.६ कोटी रुपये देऊन विकत घेतले होते. रॉबिन आयपीएलमध्ये विकला जाणारा पहिला आदिवासी खेळाडू आहे. हा २१ वर्षांचा खेळाडू बाईकवरून जात असताना त्याचा अपघात झाला. सध्या तो रुग्णालयात आहेत.

मिन्झ त्याची कावासाकी सुपरबाईक चालवत असताना नियंत्रण सुटल्यानंतर दुसऱ्या बाईकला जाऊन धडकला. मात्र, रॉबिनला फारशी दुखापत झाली नाही. त्याला किरकोळ दुखापत झाली असली तरी त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. मिन्झची प्रकृती गंभीर नसून, सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. दुचाकीच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून, मिन्झच्या उजव्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. (Robin Minz Accident)

मिन्झचे वडील रांची विमानतळावर सुरक्षारक्षक आहेत. त्यावेळी त्याचा एकदा सामना महेंद्रसिंह धोनीशी झाला होता. धोनीने मिन्झच्या वडिलांना वचन दिले होते की, जर आयपीएल २०२४ च्या लिलावात रॉबिनला कोणीही खरेदी केले नाही, तर चेन्नई सुपर किंग्ज त्याला खरेदी करेल. लिलावात चेन्नई सुपर किंग्जने मिन्झसाठी बोली लावली. या फ्रँचायझीने बोली १.२० कोटी रुपयांपर्यंत वाढवली; पण नंतर ती सोडून दिली. नंतर मुंबई इंडियन्स, गुजरात आणि सनरायझर्स हैदराबादनेही रॉबिन मिन्झसाठी बोली लावली. शेवटी गुजरातने त्याला ३.६० कोटी रुपयांना विकत घेतले. (Robin Minz Accident)

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news