IPL 2024 Final : आयपीएल फायनलची तारीख जाहीर! ‘या’ 2 मैदानांवर प्लेऑफचे सामने रंगणार

IPL 2024 Final : आयपीएल फायनलची तारीख जाहीर! ‘या’ 2 मैदानांवर प्लेऑफचे सामने रंगणार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2024 Final : आयपीएल 2024 ची धुमधडाक्यात सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांमुळे आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 7 एप्रिलपर्यंत चालणा-या या टप्प्यात 21 सामन्यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. पण त्याआधी आयपीएल 2024 चा अंतिम सामना कुठे खेळवला जाणार याबाबतची एक मोठी माहिती समोर आली आहे.

पीटीआयच्या अहवालात असे म्हटले आहे की, इंडियन प्रीमियर लीग 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. तर दुसरी क्वालिफायरही चेन्नईत होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर क्वालिफायर आणि एलिमिनेटरचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने गेल्या वर्षीच्या चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जच्या घरच्या मैदानावर सुरुवातीचे सामने आणि अंतिम सामने आयोजित करण्याची परंपरा पाळली आहे.

उर्वरित वेळापत्रक लवकरच (IPL 2024 Final)

मागील हंगामातील चॅम्पियन संघाच्या घरच्या मैदानावर आयपीएल सुरू करण्याची आणि अंतिम सामना आयोजित करण्याची परंपरा आहे. पण कोविडमध्ये या परंपरेचे पालन करता आले नव्हते. पण गेल्या हंगामात (2023) आयपीएलच्या सलामीचा आणि अंतिम सामना केवळ विजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळवला गेला. पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक निश्चित केले आहे आणि ते लवकरच जाहीर केले जाईल.

सीएसकेचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, असे मानले जात आहे. अशा परिस्थितीत चेन्नईमध्ये अंतिम सामना होणे सीएसकेच्या चाहत्यांसाठी ट्रीटपेक्षा कमी नाही. कारण चेन्नई सुपर किंग्जने यंदाच्या हंगामात अंतिम फेरी गाठली तर चाहत्यांना धोनीला त्याच्या शेवटच्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळताना पाहता येईल. सीएसकेने आयपीएल 2024 मध्ये विजयाने सुरुवात केली आहे. संघाने पहिल्या सामन्यात आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला आहे.

प्लेऑफचे सामने 'या' दोन मैदानांवर (IPL 2024 Final)

दुसरीकडे, क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर असे दोन सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तर दुसरा क्वालिफायर चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाण्याची शक्यता आहे.

IPL प्लेऑफ सामन्यांसाठी संभाव्य ठिकाणे

अंतिम साअना (26 मे) : एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
क्वालिफायर 1 : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
एलिमिनेटर : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
क्वालिफायर 2 : एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई

आयपीएल 2024 देखील मागील (2023) हंगामाप्रमाणेच होणार असून त्यात 74 सामने खेळवले जाणार आहेत. गेल्या वेळी आयपीएल 60 दिवस चालले होते. आयपीएल 2024 मध्ये, सामना जिंकणाऱ्या संघाला 2 गुण दिले जातील, तर हरणाऱ्या संघाला कोणतेही गुण मिळणार नाहीत. सामना अनिर्णित राहिल्यास किंवा निकाल न लागल्यास, दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. ग्रुप स्टेजनंतर प्लेऑफचे आयोजन केले जाईल. साखळी टप्प्यात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना होईल. क्वालिफायर-2 सामना क्वालिफायर-1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजेता यांच्यात आयोजित केला जाईल. त्यानंतर क्वालिफायर-1 आणि 2 च्या विजेत्यांमध्ये अंतिम सामना आयोजित केला जाईल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news