Andre Russell : रसेलच्या झंझावाती खेळीने गेलचा ‘हा’ माेठा विक्रम मोडीत | पुढारी

Andre Russell : रसेलच्या झंझावाती खेळीने गेलचा 'हा' माेठा विक्रम मोडीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झंझावाती खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. सामन्यात त्याने आयपीएलमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण केले. रसेल आयपीएलमध्ये सर्वात जलद 200 षटकार पूर्ण करणारा खेळाडू ठरला आहे. यामध्ये त्याने आपल्‍या देशातीलमाजी क्रिकेटपटू  ख्रिस गेल याचा विक्रम मोडला आहे. शनिवारी झालेल्‍या सामन्‍या रसेल याने 25 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी. शेवटच्या षटकात हर्षित राणाच्या चमकदार कामगिरीमुळे कोलकाताने हैदराबादचा चार धावांनी पराभव करून आयपीएल 2024 च्या मोसमाची सुरुवात केली. (Andre Russell)

केवळ 97 डावात 200 षटकार

रसेलने IPL मध्ये 97 डावात 200 षटकार मारण्याचा पराक्रम पूर्ण केला. गेलने 141 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. चेंडूंच्या बाबतीतही रसेल गेलच्या पुढे आहे. रसेलने षटकारांचे द्विशतक पूर्ण करण्यासाठी 1322 चेंडू खेळले, तर यापूर्वी केकेआरचा भाग असलेल्या गेलने 1811 चेंडूंमध्ये आयपीएलमध्ये 200 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. या यादीत तिसऱ्या स्थानावर वेस्ट इंडिजचा कायरॉन पोलार्ड आहे. त्याने आयपीएलमध्ये पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पोलार्डने 2055 चेंडू खेळून आयपीएलमध्ये 200 षटकार मारण्याचा पराक्रम केला होता. (Andre Russell)

आयपीएलमध्ये 200 षटकार पूर्ण करणारा नववा खेळाडू

आयपीएलमध्ये षटकारांचे द्विशतक पूर्ण करणारा रसेल हा जगातील नववा खेळाडू ठरला आहे. या स्पर्धेत 200 हून अधिक षटकार मारणारा रसेल हा वेस्ट इंडिजचा तिसरा खेळाडू आहे. रसेलच्या आधी गेल आणि पोलार्ड यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांच्यासह रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर आणि सुरेश रैना या खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. मात्र, आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर असून त्याने 357 षटकार ठोकले आहेत. यानंतर भारताचा रोहित शर्मा आहे ज्याच्या नावावर या स्पर्धेत 257 षटकार आहेत.

13 डावात ठोकले 5हून अधिक षटकार

रसेलने 25 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार आणि सात षटकार ठोकले. रसेलने आयपीएलमध्ये 13व्यांदा एका डावात पाचहून अधिक षटकार ठोकले. एका डावात सर्वाधिक वेळा पाच किंवा अधिक षटकार मारणारा तो पोलार्डसह संयुक्त तिसरा खेळाडू ठरला आहे.

हेही वाचा :

Back to top button