सोलापूर : भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघात आपले स्थान मिळवल्यानंतर आता सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीची (Arshin Kulkarni) आयपीएलमध्ये निवड झाली आहे. लखनऊ सुपर जायंटस्ने तब्बल वीस लाख रुपये देऊन अर्शिनला संघात घेतले आहे. त्यामुळे सोलापूरच्या शिरपेचात आणखी एक तुरा रोवला गेला आहे. (IPL 2024 Auction)
संबंधित बातम्या :
मूळचा सोलापूरचा असलेल्या अर्शिन कुलकर्णी (Arshin Kulkarni) याने जिद्द, चिकाटीने क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. दरम्यान, नुकतीच त्याची भारताच्या १९ वर्षांखालील संघात निवड झाली आहे. त्यानंतर आता अर्शिन आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मंगळवारी झालेल्या आयपीएल लिलावामध्ये अर्शिन कुलकर्णीला वीस लाखांमध्ये लखनऊ सुपर जायंटस् या टीमने विकत घेतले आहे. (IPL 2024 Auction)
ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांच्यावर 'आयपीएल' लिलावात पैशांचा वर्षाव झाला. दुबईत मंगळवारी (दि. १९) झालेल्या लिलावात कमिन्सला सनरायझर्स, हैदराबादने २०.५० कोटी रुपयांना विकत घेतले. 'आयपीएल' इतिहासातील ही सर्वात मोठी बोली होती. त्यानंतर दोन तासांतच ऑस्ट्रेलियाचा डावखुरा गोलंदाज मिचेल स्टार्कने रेकॉर्डब्रेक खरेदी किंमत मिळवली, शाहरूख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने त्याला २४ कोटी ७५ लाख रुपयांना विकत घेतले. तो 'आयपीएल'च्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. अशाप्रकारे 'आयपीएल' लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाचवेळी दोन खेळाडूंनी २० कोटी रुपयांचा टप्पा पार केला, स्टार्क, कमिन्सची मूळ किंमत दोन कोटी होती. स्टार्कसाठी कोलकाता-गुजरात भिडले होते, तर कमिन्ससाठी आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चुरस रंगली. (IPL 2024 Auction)
हेही वाचा :