IPL Auction 2024 Shubham Dubey | नागपूरच्या पानवाल्याचा मुलगा बनला कोट्यधीश, राजस्थानने मोजले ५.८० कोटी, शुभम दुबेची प्रेरणादायी गोष्ट

IPL Auction 2024 Shubham Dubey | नागपूरच्या पानवाल्याचा मुलगा बनला कोट्यधीश, राजस्थानने मोजले ५.८० कोटी, शुभम दुबेची प्रेरणादायी गोष्ट
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन : दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात मंगळवारी राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) शुभम दुबे याला ५.८० कोटी रुपये मोजून खरेदी केले. शुभम दुबेची बेस प्राइस २० लाख रुपये होती. पण राजस्थानने बेस प्राइसपेक्षा २९ पट जास्त रक्कम देऊन शुभमला आपल्या संघात सामील केले. (IPL Auction 2024)

संबंधित बातम्या 

शुभम दुबे (Shubham Dubey) मुळचा यवतमाळचा असून त्याचे वडील नागपूरमधील कमळ चौकात पानटपरी चालवतात. तो विदर्भकडून क्रिकेट खेळतो. त्याचा आयपीएलपर्यंत प्रवास अभिमानास्पद आहे. दहा वर्षापूर्वी त्याच्याकडे ग्लोव्हज खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. पण आता तो रातोरात कोट्यधीश झाला. त्याचे वडील बद्रीप्रसाद नागपूरमधील कमळ चौकात पानटपरी चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पण मंगळवारी दुबे कुटुंबियांचे भाग्य उजळले. राजस्थान रॉयल्सने शुभमला आपयीएलच्या २०२४ च्या हंगामासाठी ५.८० कोटी रुपयांना खरेदी केले.

"हे तर एक स्वप्न वाटत आहे. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे माझ्यावर लिलावात बोली लावली जाईल अशी मला आशा होती. खरे सांगायचे तर, मला इतक्या मोठ्या रकमेची अपेक्षा नव्हती," अशी भावना दुबे याने व्यक्त केल्याचे द टाइम्स ऑफ इंडियाने त्यांच्या वृत्तात म्हटले आहे.

शुभमला मोठी बोली मिळतात कमळ चौकातील त्याच्या घरी शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. २७ वर्षीय शुभम दुबे याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केली होती. तो फटकेबाजी करण्यात माहीर आहे.

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करतानाही शुभम नाबाद राहिला होता आणि त्याने केवळ २० चेंडूत ५८ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ३ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट २९० आहे.

शुभमची तुलना युवराज सिंगशी

शुभम डाव्या हाताने फलंदाजी करतो. तो लांब षटकार मारण्यासाठी ओळखला जातो. मॅच फिनिशर म्हणूनही त्याची ओळख आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये शुभमची तुलना अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग सोबत केली जाते. शुभमने युवराजप्रमाणे षटकार ठोकले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news