IPL 2023 Final : धोनीवरील निराशेचे मळभ क्षणांत हटले! जडेजाचा चौकार आणि चेन्‍नईच ‘सुपरकिंग्‍ज’

IPL 2023 Final : धोनीवरील निराशेचे मळभ क्षणांत हटले! जडेजाचा चौकार आणि चेन्‍नईच ‘सुपरकिंग्‍ज’

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेट आणि थरार हे शब्‍द समानार्थी वाटावेत असं काहीसं सोमवारी ( दि.३०) आयपीएल फायनलमध्‍ये घडलं. गुजरात आणि चेन्‍नई हे दोन दिग्‍गज संघ आमने-सामने होते. पावसामुळे राखीव दिवशी सामना खेळवला गेला. सामना सुरु होण्‍याआधी पावासाने हजेरी लावली. पुन्‍हा एक डाव झाल्‍यानंतर पावसाचा खेळ झाला. हे सारं प्रेक्षकांपेक्षाही खेळाडूंचा प्रचंड मानसिक तणाव वाढवणारं होते.

तब्‍बल रात्री साडेसात ते पहाटे दीड वाजेपर्यंत सुरु असणारा हा प्रवास दोन्‍ही संघातील खेळाडूंची सत्त्‍वपरीक्षा पाहणारा ठरला. गुजरातविरुद्धच्या अंतिम सामन्यात अनेक रोमांचक क्षण पाहायला मिळाले. कधी सामना गुजरातच्या पकडीत असल्याचे जाणवले तर कधी चेन्नईने आघाडी घेतली.

 उदास धोनीचा चेहरा खुलला…

अखेर मोक्‍याच्‍या क्षणी चेन्‍नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी बाद झाला. प्रचंड निराश अवस्‍थेत तो तंबूत परतला. चेन्नईच्या डावात दोन चेंडू बाकी असताना धोनीने डोळे मिटले. समोर पराभव दिसत असल्‍याने तो खूप उदास दिसत होता समोर दिसणारा विजय हिरावला जाण्‍याची वेदना त्‍याच्‍या चेहर्‍यावर स्‍पष्‍टपणे दिसत होती. आणि रवींद्र जडेजाने काही क्षणात हे निराशेचे मळभ दूर केले. सामन्‍यातील शेवटच्‍या दोन चेंडूवर जडेजाने १० धावा करत चेन्‍नईचा विजय अक्षरक्ष: खेचून आणला आणि आयपीएलमध्‍ये चेन्‍नईच सुपरकिंग्‍ज असल्‍याचे सिद्‍ध केले. अखेरीस सीएसकेने बाजी मारली. या सामन्याचा एक खास क्षण खूप व्हायरल होत आहे.

धोनीचा जल्‍लोष पाहण्‍यासारखाच

फायनल सामन्‍यात महेंद्रसिंह धोनी खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला होता. ज्‍या वेळी संघाला आपल्‍या खेळाची गरज आहे तेव्‍हाच आपण योगदान देवू शकलो नाही, यामुळे धोनीच्‍य चेहर्‍यावर प्रचंड निराशा होती. दोन चेंडू बाकी असताना धोनी डोळे मिटून खूप उदास दिसत होता. मात्र, यानंतर जडेजाने चमत्कार केला. त्याने मोहित शर्माच्या 15व्या षटकात पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार मारून विजय मिळवला. यानंतर जडेजा डगआऊटच्या दिशेने धावला. त्यानंतर धोनीने जडेजाला उचलून खांद्‍यावर घेतले. या दोघांचा ह फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news