IPL मधून दिल्ली कॅपिटल्ससह ‘हे’ संघ बाहेर, ‘या’ दोन संघांची अंतिम-4 मध्ये धडक

IPL मधून दिल्ली कॅपिटल्ससह ‘हे’ संघ बाहेर, ‘या’ दोन संघांची अंतिम-4 मध्ये धडक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचे 59 सामने पूर्ण झाले आहेत आणि 11 लीग स्टेजचे सामने अजून खेळायचे बाकी आहेत. साखळी फेरीत एकूण 70 सामने खेळवले जाणार आहेत. पंजाब किंग्जविरुद्ध 31 धावांनी पराभूत झाल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघ स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. त्यांचे अजून दोन लीग सामने बाकी असले तरी आकडेवारीच्या आधारे हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. पण दिल्ली कॅपिटल्स व्यतिरिक्त असे दोन संघ आहेत जे प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडले आहेत. तर, दोन संघ आहेत ज्यांचे प्ले ऑफमध्ये जाणे निश्चित मानले जात आहे.

पॉइंट टेबलवर नजर टाकल्यास गुजरात टायटन्स संघ 12 पैकी 8 सामने जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी, चेन्नई सुपर किंग्जने 12 पैकी 7 सामने जिंकले आहेत आणि त्यांचा एक सामना पावसाचा बळी ठरला आहे. धोनीचा संघ 15 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर 12 पैकी 7 सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स तिसर्‍या आणि लखनौ सुपर जायंट्स 12 सामन्यांत 13 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

स्पर्धेच्या समीकरणाबद्दल चर्चा करायची झाल्यास दिल्ली कॅपिटल्स आता अंतिम-4 च्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. दुसरीकडे, केकेआर आणि सनरायझर्स हैदराबादने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी त्यांना केवळ 14 गुणांपर्यंतच मजल मारता येईल.

प्लेऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात चुरशी लढत आहे. कारण संपूर्ण खेळ हा 16 च्या जादूई आकड्याचा खेळ आहे. पहिला संघ मात्र 18 गुणांसह पात्र ठरेल. पण गुजरातने आपले उर्वरित दोन्ही सामने गमावल्यास हा आकडा 17 किंवा 19 पर्यंत जाऊ शकतो. कारण सीएसकेचे 15 गुण आहेत आणि जर संघाने दोन्ही सामने जिंकले तर त्याचे 19 गुण होतील, जर एक सामना जिंकला तर 17 गुण होतील. गुजरात सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर मुंबईलाही 18 गुण मिळवण्याची संधी आहे. अशा स्थितीत प्लेऑफमधील शेवटच्या दोन-एक स्थानांच्या शर्यतीत 16 चा आकडा जादुई आकडा म्हणून समोर येईल.

असे आहे समीकरण?

आरसीबी, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स हे प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी लढणार आहेत. हे सर्व संघ 16 गुणांचा आकडा गाठू शकतात. मात्र आगामी सामन्यांमध्ये हे सर्वजण एकमेकांसमोर उभे ठाकतील म्हणजे एक संघ पुढे जाईल आणि एक बाहेर जाईल, अशी समीकरणे तयार होताना दिसत आहेत.

लखनौकडून पराभूत झाल्यानंतर, सनरायझर्सच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत कारण ते येथून 16 चा आकडा गाठू शकणार नाहीत. याशिवाय पंजाबने दिल्लीला हरवून आपला दावा कायम ठेवला आहे. आता रविवारी राजस्थान आणि आरसीबीचा यांच्यापैकी एक संघ पराभूत झाल्यानंतर 16 च्या आकड्यापासून तो वंचित राहणार आहे. त्यामुळे केकेआरला थोडीथोडकी आशा आहे. अन्यथा, सीएसके विजयासह प्लेऑफसाठी पात्र होण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. जर केकेआरने उद्याचा सामना गमावला तर ते स्पर्धेतून आउट होतील आणि चेन्नई 17 गुणांसह अव्वल स्थानावर येईल. मात्र, सीएसके हा सामना गमावला तरी ते प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहतील.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news