Devon Conway : आयपीएलमध्ये कॉनवेला पाठिंबा देण्यासाठी पत्नीने सोडली नोकरी, कारण…

Devon Conway : आयपीएलमध्ये कॉनवेला पाठिंबा देण्यासाठी पत्नीने सोडली नोकरी, कारण…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL Final CSK vs GT : आयपीएल (IPL 2023) आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आज रात्री 7.30 वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी सीएसकेने (CSK) डेव्हन कॉनवे (Devon Conway) आणि त्याची पत्नी किम यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये हे जोडपे त्यांची प्रेमकथा सांगताना दिसत आहे. दरम्यान, कॉनवेच्या पत्नीने तिचे मनोगत व्यक्त करताना मोठा एक धक्कादायक खुलासा केला.

कॉनवेची पत्नी किम म्हणाली, 'आयपीएलमध्ये पतीला पाठिंबा देण्यासाठी मी नोकरीचा राजीनामा देऊन भारतात आले. एवढेच नाही तर आता मी माझे प्रोफेशन बदलण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून मला पुढच्या वर्षी आयपीएलसाठी भारतात येताना कोणतीही अडचण येणार नाही.' (IPL Final CSK vs GT)

चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सलामीवीर डेव्हॉन कॉनवे (Devon Conway) सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. ऋतुराज गायकवाड सोबत त्याने सीएसकेला अनेक सामन्यांमध्ये दमदार सुरुवात करून दिली आहे. आज आयपीएल 2023 चा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यात सीएसके आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. दरम्यान, या सामन्यापूर्वी सीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये किम ही आईपीएलमध्ये आपला पती डेव्हॉन कॉनवेला (Devon Conway) सपोर्ट करण्यासाठी भारतात येण्यासाठी नोकरी कशी सोडली हे सांगताना दिसत आहे.

किमने म्हणते, मी एका आयटी कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करत होते. मात्र, आयपीएलमध्ये पतीला पाठिंबा देण्यासाठी भारतात यावे लागल्याने मी त्या नोकरीचा राजीनामा दिला. अशा कंपन्यांमध्ये काम करत असताना दरवर्षी आयपीएलसाठी भारतात येणे अशक्य आहे. म्हणूनच आता मी माझे प्रोफेशन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मार्केटिंग फिल्ड सोडून मी आता अध्यापनाच्या क्षेत्राची निवड केली आहे. यासाठी न्यूझीलंडमध्ये मी एक वर्षाचा कोर्स केला आहे. मी माझ्या निर्णयावर खूप आनंदी आहे,' असेही तिने सांगितले. (IPL Final CSK vs GT)

डेव्हॉन कॉनवेच्या इंडियन प्रीमियर लीगशी निगडित अनेक आठवणी आहेत. गेल्या वर्षी आयपीएलदरम्यानच त्याने लग्न केले आणि सीएसकेनेही त्याचे सेलिब्रिशन केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news