IPL 2022 : कोरोनामुळे दिल्ली-पंजाब सामन्याबाबत BCCI ने घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2022 : कोरोनामुळे दिल्ली-पंजाब सामन्याबाबत BCCI ने घेतला ‘हा’ निर्णय
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलमध्ये (IPL) कोरोनाच्या एन्ट्रीनंतर मंगळवारी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील उद्या (दि. २०) बुधवारी पुण्यात सामना होणार नाहीय. आता हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. खुद्द बीसीसीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली आहे.

सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ क्वारंटाईनमध्ये आहे. दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श आणि इतर तीन ससस्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टीमचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट आणि डॉक्टर साळवी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बुधवारी (दि. २०) होणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्यावर धोक्याचे सावट निर्माण झाले. हा सामना पूर्वी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणार होता, मात्र आता कोरोना संसर्गामुळे हा सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) सकाळी ९ वाजता दिल्लीच्या सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी झाली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून प्रशासकीय समितीने सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीचा संपूर्ण संघ सध्या मुंबईतच क्वारंटाईन

१६ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या कोरोना चाचणीत दिल्ली संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी सातत्याने केली जात आहे. त्याच वेळी, सोमवारी दिल्लीचा खेळाडू मिचेल मार्शची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर सोमवारीच त्याची दोनदा आरटीपीसीआर चाचणी झाली. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर रात्री उशिरा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मार्श व्यतिरिक्त दिल्ली टीमचे एक डॉक्टर, 1 सोशल मीडिया टीमचे सदस्य आणि मसाज थेरपिस्ट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संसर्गामुळे संपूर्ण टीमला क्वारंटाईन करण्यात आले आहे.

गेल्या हंगामात 8 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आयपीएल थांबवण्यात आले

1. गेल्या वर्षी एप्रिल-मे मध्ये खेळल्या जात असलेल्या IPL च्या 14 व्या मोसमात 3 दिवसात 3 संघांचे 4 खेळाडू, 2 प्रशिक्षक आणि 2 इतर कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे IPL सामन्यांनंतर थांबवण्यात आले. नंतर, आयपीएलचे उर्वरित 31 सामने ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये खेळले गेले.

2. त्यावेळी सर्वप्रथम, कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीसह दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला. केकेआरच्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीसह चेन्नई सुपर किंग्जच्या तीन सदस्यांनाही कोरोनाचा फटका बसला.

3. यानंतर सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान साहा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला. नंतर दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा देखील कोरोनाने गाठले. याशिवाय दिल्लीतील स्टेडियममधील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर आयपीएल थांबवण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news