iPhone china news : मेड इन इंडिया iPhone ची जगभरात विक्री; चीनचे पित्त खवळले

iphone china news
iphone china news
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: ॲपलने नुकतीच आपली iPhone -१५ सिरीज लॉन्च केली आहे. दरम्यान ॲपलने पहिल्यांदाच मेड इन इंडिया iPhone देखील याच दिवशी लॉन्च केला. दरम्यान, चीनमधील सोशल मीडियावर म्हटले जात आहे की, मॅन्युफॅक्चरर iPhone -१५ सिरीज केवळ यूरोप आणि अमेरिका बाजारातच लॉन्च होणार आहे. iPhone 15 सिरीज जगभरातील बाजारात विकण्यासाठी भारतात बनवले जात असल्याचे ॲपने स्पष्ट केले आहे. यानंतर चीनमधील सोशल मीडियावर भारताला हिनवत भारताची खिल्ली उडवली जात आहे. चीनमधील सोशल मीडियावर भारताला हिनवणारे मिम्स व्हायरल होत असल्याचे 'firstpost' ने वृत्त दिले आहे. (iPhone china news)

चीनच्या सोशल मीडियावर भारताबाबत विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या जात आहेत. वर्णद्वेषी टिप्पण्यांपासून भारतावर आणि भारतीयांवर अनेक प्रकारचे टोमणे मारले जात आहेत. चीनच्या सोशल मीडिया वीबोवर युजर्स भारताला असे म्हणत टोमणे मारत आहेत की, तुम्ही मेड इन इंडिया आयफोन 15 चे कव्हर काढताच तुम्हाला करीचा वास येईल. हे भारतात चालते पण हा स्वच्छतेचा मुद्दा आहे, असे मिम्स देखील चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (iPhone china news)

चीनमधील सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दुसर्‍या एका पोस्टमध्ये हाताने भात आणि करी खाणाऱ्या भारतीयांवर टोमणा मारण्यात आला आहे. पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, भात आणि करी हाताने खाल्ल्यानंतर हे लोक डोळे चोळतात आणि नंतर फोनला स्पर्श करतात. त्यामुळे भारतात बनवलेल्या आयफोनपासून संसर्ग होऊ शकतो, असेही म्हटले आहे. (iPhonechina news)

ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले होते की, 'ॲपल भारतात बनवलेले आयफोन विकणार आहे'. या अहवालानंतरच चीनमध्ये अशी खिल्ली उडवणे सुरू झाले आहे. जर तुम्ही चीनमध्ये नवीन आयफोन खरेदी केला तर, तुम्हाला भारतात बनवलेला आयफोन मिळू शकेल, असे देखील चीनच्या सोशल मीडिया वेबोवर पोस्ट व्हायरल होत आहेत. या हॅशटॅगबाबत चीनमध्ये विविध प्रकारचे मीम्स बनवले जात आहेत. (iPhone china news)

 

View this post on Instagram

 

A post shared by Firstpost (@firstpost)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news