Biparjoy Cyclone : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत चर्चा

Biparjoy Cyclone : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत चर्चा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : बिपरजॉय वादळामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगाने संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांसोबत चर्चा केली. बिपरजॉय वादळ गुरुवारी (दु.१५) धडकणार असून गुजरातला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. (Biparjoy Cyclone)

कच्छमध्ये वादळ आल्याल्यानंतर ते राजस्थानपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वादळाचा मुकाबला करण्यासाठी सैन्यदलाचे जवान ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. याबाबत राजनाथ सिंग यांनी तयारीचा आढावा घेतला. संकटकाळात नागरिकांना हरतऱ्हेची मदत करण्याचे निर्देश याआधीच देण्यात आले आहेत. (Biparjoy Cyclone)

बिपरजॉय वादळ गुरूवारी गुजरातच्या मांडवी ते पाकिस्तानमधील कराची दरम्यान कुठेही धडकू शकते. सौराष्ट्र आणि कच्छला त्याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. वादळाच्या अनुषंगाने हवामान खात्याने ऑरेंज ऍलर्ट जारी केलेला आहे.

हेही वाचा;

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news