International Yoga Day 2023 : योग दिनी श्वानानेही केली योगासने; ITBP कॅम्पमधील व्हिडिओ व्हायरल

International Yoga Day 2023
International Yoga Day 2023
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आज आंतरराष्ट्रीय योग दिन. संपुर्ण देश या दिनानिमित्त आज 'योगमय' झाला आहे. सर्वत्र योगासनाचे महत्त्व आधोरेखित केले जात आहे. आपल्या मानसिक व शारिरीक आरोग्यासाठी विविध ठिकाणी आयोजित योगासनात सर्वजण सहभागी झाले. विविध ठिकाणच्या योगासन कार्यक्रमांचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच, एक श्वानही योगासने करत असेलला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (International Yoga Day 2023)

International Yoga Day 2023 : व्हिडिओ व्हायरल

विविध देशात  आज आंतरराष्ट्रीय योग साजरा होत आहे. दरवर्षी हा दिवस २१ जून रोजी साजरा केला जातो. जगभरात १८० हून अधिक देश हा दिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर योग दिनाचे विविध व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर समोर येत आहेत. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एका श्वानाचा आहे. तो श्वान इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसच्या श्वान पथकातील आहे. ( ITBP-Indo-Tibetan Border Police) हा श्वान व्हिडिओत इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे उधमपूर, जम्मू आणि काश्मीरमधील कॅम्पमध्ये योगासनाचे प्रकार करताना दिसतो.

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस पथकाचे गौरव शाव ( Dy Commandant) माध्यमांशी बोलताना म्हणाले, केवळ आमचे जवानच नाही तर आमचे श्वान पथकही योगाभ्यास करते. कॅनाइन पथकाला सतत सतर्क राहावे लागते, आम्हाला त्यांची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना मदत होते. म्हणून आम्ही त्यांना योगाभ्यास करायला लावतो"

पहिल्यांदा योग दिन २०१५ साली

आंतरराष्ट्रीय योग दिन हा दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानुसार दि. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यंदाही योगदिन विविधतेने साजरा होत आहे.

International Yoga Day 2023 : यंदाची योग दिनाची थीम…

यावर्षी योग दिनाची थीम 'वसुधैव कुटुंबकम्साठी योग' अर्थात 'एक विश्व-एक कुटुंब' या स्वरूपात सर्वांच्या कल्याणासाठी योग आहे. तो योगाच्या भावनेवर भर देतो, जो सर्वांना एकत्र करतो आणि सोबत घेऊन जातो. दरवर्षीप्रमाणे या वेळीही देशाच्या कानाकोपऱ्यात योगाशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news