पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या INSAT-3DS या हवामान उपग्रहाने महत्त्वपूर्ण डेटा अपडेट देण्यास सुरूवात केली आहे. उपग्रहावरील काही उपकरणांनी डेटाचा पहिला संच पाठवण्यास सुरूवात केली आहे. 'इनसॅट-थ्रीडीएस' या उपग्रहाने पृथ्वीची बहुरंगी छबीदेखील टिपली आहे, अशी माहिती इस्रोने एक्स अकाऊंटवरून केलेल्या पोस्टमधून दिली आहे. (INSAT-3DS Mission)
इस्रोने म्हटले आहे की, "17 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे (Isro) श्रीहरिकोटा येथून INSAT-3DS चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते". त्यानंतर या उपग्रहासंदर्भात इस्रोने मोठी अपडेट दिली आहे. या उपग्रहावरील आधुनिक इमेजर आणि साउंडर पेलोड्स ऑनबोर्डने पृथ्वीच्या सौंदर्य आणि जटिलतेची पहिली झलक समोर आणली आहे. (INSAT-3DS Mission)
हवामान उपग्रह INSAT-3DS हा इमेजर आणि साउंडर पेलोडसह सुसज्ज आहे. जो पृथ्वीच्या वातावरणातील गतिशीलता अभूतपूर्व दृश्ये आणि अंतर्दृष्टी प्रदान करतो. हा डेटा भारतीय शास्त्रज्ञांसाठी केवळ शास्त्रीय अभ्यास, हवामान अंदाज आणि वातावरणातील गतिशीलता समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण इनपुट म्हणून काम करतो, असेदेखील इस्रोने म्हटले आहे. (INSAT-3DS Mission)
हवामानविषयक निरीक्षणे, हवामान अंदाज आणि आपत्ती इशारा जमीन आणि महासागराच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करणे. उपग्रह सहाय्यित शोध आणि बचाव सेवा प्रदान करणे. तसेच विद्यमान कार्यरत INSAT-3D आणि INSAT-3DR उपग्रहांद्वारे प्रदान केलेल्या सेवांचे सातत्य सुनिश्चित करणे हे या मिशनचे उद्दिष्ट आहे, असेही इस्रोने म्हटले आहे.
INSAT-3DS हा हवामानविषयक उपग्रह समुद्राच्या पृष्ठभागाचा तपशीलवार अभ्यास करेल, ज्यामुळे हवामानाची अचूक माहिती मिळेल, तसेच नैसर्गिक आपत्तींबाबत अधिक चांगले अंदाज येण्यास मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तींची अचूक माहिती अगोदर मिळाल्यावर त्या रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील. त्यामुळे भारतीय हवामान संस्थांसाठी हा हवामान उपग्रह अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
हे ही वाचा: