बारामती : पुढारी वृत्तसेवा: बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिस हवालदार संदीप जगन्नाथ कदम (वय ४३, रा. बारामती, मूळ रा. लासूर्णे, ता. इंदापूर) यांचे सोमवारी (दि. २५) उपचारादरम्यान निधन झाले. शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी ते व्यायामासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या तीन चाकी टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती.