INDvsWI : ‘या’ खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन

INDvsWI : ‘या’ खेळाडूचं भारतीय संघात पुनरागमन

पुढारी  ऑनलाईन डेस्क 

वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्माचं दोन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. तर विराट कोहली या मालिकेसाठी दोन्ही मालिकांसाठी उपलब्ध आहे. भुवनेश्वर कुमारला टी-20 मालिकेमध्ये घेण्यात आले आहे तर, वनडे संघातून वगळण्यात आले आहे, तर जसप्रीत बुमराहला मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या दोन वेगवान गोलंदाजांना एक दिवसीय मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. तर, के. एल. राहुल दुसऱ्या वनडे सामन्यासाठी उपलब्ध होणार आहे. रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापतग्रस्त असल्यामुळे त्याला संघाच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये स्थान मिळालेले नाही. तर अक्षर पटेल फक्त टी-20 संघात समाविष्ट करण्यात आले आहे.

'या' खेळाडूचे संघात पुनरागमन

फिरकीपटू कुलदीप यादवचे भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन झाले आले. त्याला वनडे मालिकेसाठी संघात घेण्यात आले आहे. कुलदीप यादव याच्या गुडघ्याचे ऑपरेशन करण्यात आले होते. सध्या तो तंदूरुस्त होऊन संघात पुनरागमन करत आहे.

कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन

कर्णधार रोहित शर्मा दुखापतीतून सावरल्यानंतर संघात पुनरागमन करत आहे. दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका खेळू शकला नव्हता. कर्णधार झाल्यानंतर रोहितची ही पहिली वनडे मालिका असेल. गेल्या काही दिवसांपासून तो बंगळूर येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये होता आणि तिथेच तो बरा होत होता. बीसीसीआयच्या नवीन नियमांनुसार, दुखापती किंवा कोणत्याही समस्येतून पुनरागमन करणाऱ्या कोणत्याही खेळाडूला फिटनेस चाचणीत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

भारतीय संघाला विंडीज विरूद्ध आपल्या मायभूमीत 3 वन-डे आणि 3 टी-20 सामने खेळावे लागणार आहेत. वनड-डे मालिकेतील सर्व सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6, 9, 11 फेब्रुवारी या दिवशी खेळवण्यात येणार आहेत. तर, टी-20 सामन्यांची मालिकेतील सर्व सामने कोलकत्ता येथील ईडन गार्डन मैदानावर 16, 18, 19 या दिवशी खेळवले जाणार आहेत

भारतीय क्रिकेट संघ खालाीलप्रमाणे

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

T20 संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि हर्षल पटेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news