Team India : टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, 109 वर ऑलआऊट होताच…

Team India : टीम इंडियाच्या नावावर लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, 109 वर ऑलआऊट होताच…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Team India : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा तिसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेली रोहित सेना दुसऱ्या सत्रातच ड्रेसिंग रुममध्ये परतली. ऑस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी सुरेख गोलंदाजी करत भारतीय संघाला अवघ्या 109 धावांत गुडघे टेकायला भाग पाडले. यासह भारतीय संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.

भारताने (Team India) ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्याच भूमीवर चौथी सर्वात छोटी कसोटी धावसंख्या उभारली. भारताचा एकही फलंदाज जास्त वेळ क्रीझवर टिकू शकला नाही. कोहलीने सर्वाधिक 22 धावा केल्या. यापूर्वी भारताने 2017 मध्ये पुण्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 105 आणि 107 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताची सर्वात कमी धावसंख्या 104 आहे.

इंदूर कसोटीत भारताने (Team India) आणखी एक लाजिरवाणा विक्रम केला. वास्तविक, भारतीय संघ आपल्या पहिल्या डावात केवळ 33.2 षटकेच फलंदाजी करू शकला. घरच्या मैदानावर भारतीय संघाने खेळलेली ही चौथ्या क्रमांकाची षटके आहे. 1987 मध्ये दिल्लीत वेस्ट इंडिज विरुद्ध सामना झाला होता, ज्यामध्ये भारताने 30.5 षटके खेळली होती आणि संघ फक्त 75 धावांवर गारद झाला होता.

स्पिनर्सच्या जाळ्यात टीम इंडिया फसली

भारतीय संघाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी आश्वासक सुरुवात केली होती. संघाने एकही विकेट न गमावता 27 धावा जोडल्या होत्या. यानंतर एकापाठोपाठ विकेट गेल्या आणि संघ 109 धावांवर ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी चांगली गोलंदाजी केली. या मालिकेत पदार्पण करणाऱ्या मॅथ्यू कुहनेमनने 5 तर नॅथन लायनने 3 बळी घेतले. टॉड मर्फीला 1 यश मिळाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news