Ashwin Top Test Bowler: अश्विन बनला नंबर-1 कसोटी गोलंदाज, जेम्स अँडरसनला टाकले मागे | पुढारी

Ashwin Top Test Bowler: अश्विन बनला नंबर-1 कसोटी गोलंदाज, जेम्स अँडरसनला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashwin Top Test Bowler : आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने ताज्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला मागे टाकत नंबर-1 कसोटी गोलंदाजाचा मुकुट जिंकला आहे. अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत दमदार कामगिरी केली होती, ज्याचा त्याला ताज्या क्रमवारीत फायदा झाला आहे. 36 वर्षीय अश्विन 2015 मध्ये प्रथमच नंबर-1 कसोटी गोलंदाज बनला होता.

ICC Test Rankings: आईसीसी रैंकिंग में आर अश्विन का राज, इस खूंखार गेंदबाज को पछाड़कर बने नंबर 1 टेस्ट गेंदबाज

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. त्याने नागपूर आणि दिल्ली कसोटीत 14 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर त्याने आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज अँडरसनला एका आठवड्यातच टॉप गोलंदाजाचे सिंहासनावरून पाय उतार होण्यास भाग पाडले. अश्विनचे ​​आता 864 रेटिंग आहेत. त्याचवेळी अँडरसन 859 रेटींगसह दुसऱ्या स्थानावर आहे. दोघांमध्ये आता 5 रेटींगचा फरक आहे. अश्विनशिवाय जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा टॉप-10 मध्ये समावेश आहे. बुमराह चौथ्या, तर जडेजा आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी पाचव्या क्रमांकावर आहे. (Ashwin Top Test Bowler)

इंग्लंडचा ओली रॉबिन्सन सहाव्या आणि द. आफ्रिकेचा कागिसो रबाडा सातव्या क्रमांकावर स्थानी आहे. न्यूझीलंडचा काईल जेमिसन 9व्या तर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क 10व्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी 18 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, अष्टपैलू रँकिंगमध्ये भारतीत खेळाडूंचा दबदबा आहे. जडेजा अव्वल स्थानी कायम असून त्याच्या खालोखाल दुस-या क्रमांकावर आणि आर अश्विन आहे. तर अक्षर पटेल पाचव्या क्रमांकावर आहे. (Ashwin Top Test Bowler)

Back to top button