Indore temple stepwell collapse : इंदूरमधील मंदिर दुर्घटनेतील मृतांची संख्‍या ३५ वर

Indore temple stepwell collapse : इंदूरमधील मंदिर दुर्घटनेतील मृतांची संख्‍या ३५ वर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गुरुवारी (दि. ३०) रामनवमीनिमित्त धार्मिक कार्यक्रम सुरु असताना मोठी दुर्घटना घडली. शहरातील पटेल नगरमध्ये श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरात विहिरीचे छत कोसळल्याने भाविक पाण्‍यात पडले. या दुर्घटनेत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यापैकी २ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एक व्यक्ती अद्याप बेपत्ता आहे. अशी माहिती इंदूरचे जिल्हाधिकारी डॉ. इलायराजा टी यांनी दिली. लष्कर, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक शोध आणि बचावकार्य करत आहे. (Indore temple stepwell collapse)

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सपना संगीता रोडवरील स्नेह नगर येथे मंदिरात होम सुरू असताना हा अपघात झाला. कन्यापूजनाचा कार्यक्रम असल्याने मंदिरात भाविकांची गर्दी होती. विहिरीच्या छतावर ३० हून अधिक लोक बसले होते. अतिरिक्‍त वजनामुळे विहिरीचे छत तुटले. ३० हून अधिक भाविक ४० फूट खाली पडले.

मंदिर परिसरात खोदकाम

'एएनआय' वृत्तसंस्थेने दिलेल्‍या वृत्तानुसार, मंदिर परिसरात बांधकाम आणि उत्खननाचे काम सुरू आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या बांधकामामुळे विहिरीची भिंत कोसळल्याने फरशी कोसळण्याची शक्यता आहे. याशिवाय उंदरांमुळे विहीर पोकळ झाल्याचेही स्‍थानिकांनी सांगितले. मात्र, अपघाताच्या कारणाबाबत अद्याप प्रशासनाने कोणाताही खुलासा केलेला नाही. (Indore temple stepwell collapse)

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news