खलिस्तानी समर्थकांना कॅनडात भारतीयांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

खलिस्तानी समर्थकांना कॅनडात भारतीयांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅनडाच्या टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर खलिस्तान समर्थकांनी शनिवारी (दि.८) निदर्शने केली. मात्र, येथील भारतीयांनी खलिस्तानी समर्थकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. भारतीय समुदायाच्या लोकांनी तिरंगा फडकावून खलिस्तानी निदर्शकांना विरोध दर्शवला.

याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका बाजूला खलिस्तानी समर्थक भारतीय दूतावासासमोर घोषणाबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे, भारतीय लोक मोठ्या संख्येने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रध्वजासह एकत्र आले आहेत. तिरंगा फडकावून त्यांनी खलिस्तान समर्थकांना विरोध दर्शवला.

दरम्यान, यापूर्वी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर ३० ते ४० खलिस्तानी समर्थक जमा झाल्याची घटना समोर आली होती. युनायटेड किंगडम पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. मात्र, काही वेळाने खलिस्तान समर्थकांनी तेथून पळ काढला. केवळ ब्रिटनच नाही तर विविध देशातील खलिस्तानी समर्थक भारतीय उच्चायुक्तांना लक्ष्य करत आहेत.

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर खलिस्तानी समर्थकांनी पुकारलेल्या निदर्शनात खूम कमी लोक सहभागी झाले होते. रॅलीमध्ये भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी आणि बर्मिंघममधील भारताचे महावाणिज्यदूत डॉ. शशांक विक्रम यांच्या फोटोंसह हिंसा भडकावणारे वादग्रस्त पोस्टर्स वापरण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने पोलिस उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी खलिस्तानी समर्थकांनी भारतविरोधी पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यांनंतर ब्रिटिश सरकारने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर कोणताही हल्ला अस्वीकार्य असल्याचे जाहीर केले होते.

सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासात सुरक्षा वाढवली

८ जुलै रोजी खलिस्तान समर्थक रॅलीच्या पार्श्वभूमीवर सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दूतावासाबाहेर बॅरिकेड्स लावण्यात आले असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. २ जुलै रोजी खलिस्तान समर्थकांनी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता. त्यावेळी वॉशिंग्टन डीसी येथील भारतीय दूतावासाजवळही सुरक्षा वाढवण्यात आली होती. दरम्यान, अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी दूतावास येथे जाऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news