Indians at Israel | लेबनॉन हल्ल्यानंतर इस्रायलमधील भारतीयांच्या सुरक्षेसाठी जारी केली ॲडव्हाजरी

 Indians at Israel
Indians at Israel

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेबनॉनमधून डागलेल्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात इस्रायलच्या उत्तर सीमेजवळ एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. तर या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी घडली असून, हे तिघे भारतीय मूळचे केरळचे आहेत, असे वृत्तात म्हटले आहे. या घटनेनंतर इस्रायल सीमेवरील भारतीयांसाठी भारत सरकारने ॲडव्हाजरी जारी केली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्यास सांगितले आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Indians at Israel)

प्रचलित सुरक्षा परिस्थिती आणि स्थानिक सुरक्षा सल्लामसलत लक्षात घेता, इस्रायलमधील सर्व भारतीय नागरिकांना, विशेषत: उत्तर आणि दक्षिणेकडील सीमा भागात काम करणाऱ्या किंवा भेट देणाऱ्यांना इस्रायलमधील सुरक्षित भागात स्थलांतरित होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी इस्रायली सर्व अधिकारी आमच्या संपर्कात आहेत, असे इस्रायलमधील भारतीय दूतावासाने X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. ( Indians at Israel)

लेबनॉनमधून झालेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात इस्त्रायलच्या उत्तर सीमावर्ती भागातील मार्गालियट समुदायाजवळील एका बागेला लक्ष्य केले. यामध्ये एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. यानंतर एका दिवसाने भारतीय दूतावासाने येथील सीमाभागातील भारतीयांना सावधगिरीचा सल्ला दिला आहे. ( Indians at Israel)

लेबनॉनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू, दोघे जखमी, तिघेही केरळचे

लेबनॉनमधून डागण्यात आलेले क्षेपणास्त्र सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास इस्रायलच्या उत्तरेकडील गॅलिली प्रदेशातील मोशाव (सामूहिक कृषी समुदाय) मार्गालिओट येथील भागावर कोसळले, असे बचाव सेवा मॅगेन डेव्हिड अडोम (एमडीए) चे प्रवक्ते झाकी हेलर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. या घटनेतील मृताचे नाव पॅटनिबीन मॅक्सवेल असे नाव आहे. तो मूळचा केरळमधील कोल्लम येथील आहे. बूश जोसेफ जॉर्ज आणि पॉल मेल्विन अशी जखमी झालेल्या दोन भारतीयांची नावे आहेत.

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news