Smriti Mandhana : स्मृती मानधनाला ‘T20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराचे सलग दुसऱ्यांदा नामांकन

Smriti Mandhana : स्मृती मानधनाला ‘T20 क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्काराचे सलग दुसऱ्यांदा नामांकन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताची धकडाकेबाज फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना (Smriti Mandhana) हिला बुधवारी सलग दुसऱ्यांदा ICC महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. तिच्याशिवाय, पाकिस्तानची ऑफस्पिन अष्टपैलू निदा दार(Nida Dar), न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन (Sophie Devine) आणि ऑस्ट्रेलियन वेगवान अष्टपैलू ताहलिया मॅकग्रा (Tahlia Mcgrath) यांनाही या सन्मानासाठी नामांकन देण्यात आले आहे.

स्मृतीने (Smriti Mandhana) यावर्षी T20 मध्ये दमदार कामगिरी केली आहे. 2022 मध्ये पाच अर्धशतकांसह 23 सामन्यांमध्ये तिने 594 धावा केल्या आणि T20 मध्ये 2500 धावांचा टप्पा ओलांडला आहे. तसेच तीने सर्वात जलद अर्धशतक झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटर बनण्याचा बहुमान यंदा आपल्या नावावर केला. तिने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना केला.

भारताच्या या डावखुऱ्या महिला फलंदाजाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा (2022), बांगलादेशातील महिला टी-20 आशिया चषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 घरच्या मालिकेत दमदार कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या टी २० मालिकेतील एका सामन्यात स्मृतीने (Smriti Mandhana) आतापर्यंत सर्वात मोठी आणि कायमस्वरुपी स्मरणात राहिल अशी खेळी खेळली. मुंबईतील डी. वाय. पाटील मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्मृतीने ४९ चेंडूत ७९ धावा बनविण्याची कामगिरी केली होती.

या सामन्यात भारतला १८८ धावा बनवायच्या होत्या. पण, भारताने ५ बाद १८७ धावा केल्या आणि सामना बरोबरी रोखला गेला. या सामन्यात स्मृतीने भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. सामना टाय झाल्याने सामना सुपर ओवरमध्ये गेला आणि सुपर ओवर मध्ये स्मृतीने १३ धावा करत भारताला १ बाद २० धावसंख्येपर्यंत पोहचवले. हे आव्हान ऑस्ट्रेलिया पेलू शकला नाही व या सामन्यात स्मृतीच्या स्फोटक फलंदाजीमुळे भारताने विजय नोंदवला.

स्मृती मानधनासह पाकिस्तानची अनुभवी अष्टपैलू खेळाडू निदाने सुद्धा यावर्षी आपल्या फलंदाजीने सर्वाना प्रभावित केले आहे. तिने यावर्षी तीन वेळा पन्नास पेक्षा जास्त स्कोअर केला आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत नाबाद अर्धशतक, आशिया चषक स्पर्धेत भारताविरुद्ध अर्धशतक आणि नोव्हेंबरमध्ये आयर्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर ६१ धावा केल्या आहेत. निदाने महिला आशिया कपमध्ये ७२.५० सरासरीने १४५ धावा केल्या होत्या. शिवाय तिने ८ बळी सुद्धा मिळवले होते.

न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईने सुद्धा २०२२ हे साल गाजवले आहे. ती ऑलराउंडर विभागात सर्वोच्च स्थानी आहे. तिच्या नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड संघाने २०२२ मध्ये १४ पैकी ११ सामने जिंकले आहेत.

यासह ऑक्टोंबर २०२१ मध्ये टी २० मध्ये पदार्पण करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू ताहलिया मॅकग्राने पहिल्याच वर्षात मोठी गवसणी घातली आहे. तिने पाच सामन्यात ४२.६६ च्या सरासरीने १२८ धावा बनवल्या आहेत. सध्या ती टी २० मध्ये फलंदाजी क्रमवारीत अग्रस्थानी आहे.


अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news