Commonwealth Games 2022 : वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमी लालरिनुंगाची सुवर्ण पदकावर माेहर

Commonwealth Games 2022 :  वेटलिफ्टिंगमध्ये जेरेमी लालरिनुंगाची  सुवर्ण पदकावर माेहर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन:  बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्‍या २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर जेरेमी लालरिनुंगा याने सुवर्ण पदक पटकावले.  त्‍याने 67 किलो वजनी गटात सर्वोत्‍कृष्‍ट कामगिरी करत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले आहे. राष्‍ट्रकूल स्‍पर्धेतील भारताचे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. मीराबाई चानूनंतर जेरेमीने वेटलिफ्टिंगमध्ये ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

भारताच्या या स्टार खेळाडूने एकूण 300 किलो वजन उचलले आहे. स्नॅचमध्ये 140 किलो वजन उचलले. ज्यामध्ये त्याने या स्पर्धेतील विक्रम केला. तर जेरेमीने क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलो वजन उचलले. तिसऱ्या प्रयत्नात त्याला 165 किलो वजन उचलायचे होते, पण त्यात तो अपयशी ठरला. क्लीन आणि जर्क फेरीदरम्यान जेरेमी लालरिनुंगाला दोन वेळा दुखापत झाली. पण त्याने हार मानली नाही आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत सामोआच्या वॅपवानेवोने रौप्य आणि नायजेरियाच्या ए. जोसेफने कांस्यपदक जिंकले. विशेष बाब म्हणजे कॉमनवेल्थ 2022 मध्ये भारताला वेटलिफ्टर्सकडून आतापर्यंत पाच पदके मिळाली आहेत.

टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात पहिले सुवर्णपदक जिंकले होते. जेरेमीने 2018 च्या उन्हाळी युवा ऑलिंपिकमध्ये पुरूषांच्या 62 किलो वजनाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी जेरेमीने स्नॅच राउंडमध्ये 124 आणि क्लीन अँड जर्कमध्ये 150 किलो वजन उचलले होते. म्हणजेच जेरेमीने एकूण 274 किलो वजन उचलून हे पदक जिंकले होते. यासह जेरेमी युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा हा पहिला भारतीय ठरला होता. त्यानंतर जेरेमीने आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news