पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील इंडियानामधील एका जीममध्ये भारतीय विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्याची प्रकृती चिंताजनक आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने या वृत्तसंस्थेने 'एनडब्ल्यूआययू टाईम्स'च्या हवाल्याने दिली आहे. ( Indian student stabbed in US ) अमेरिकन पोलीस अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. या घटनेनंतर हल्लेखोराला अटक करण्यात आली असून त्याच्यावर प्राणघातक शस्त्राने हल्ला आणि खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंडियानामधील वालपरिसो शहरात 24 वर्षीय भारतीय विद्यार्थी वरुण जीम (व्यायामशाळा) मध्ये गेला होता. हल्लेखोर जॉर्डन आंद्राडे याने वरुणला चाकूने भोसकले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला फोर्ट वेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार वरुणची प्रकृती चिंताजनक आहे.
हेही वाचा :