Indian Student In Us: बेपत्ता भारतीय विद्यार्थी अमेरिकेत मृतावस्थेत सापडला

 Indian Student In Us
Indian Student In Us

पुढारी ऑनलाईन डेस्क: गेल्या एक महिन्यापासून बेपत्ता असलेला २५ वर्षीय भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील ओहायो या शहरात मृतावस्थेकत आढळून आला आहे. मोहम्मद अब्दुल अरफाथ असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो हैद्राबाद (तेलंगणा) येथील रहिवाशी आहे. या सदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. (Indian Student In Us)

परदेशात भारतीय समुदायांबाबत घडणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने अर्फथच्या मृत्यूची पुष्टी केली. आठवड्याभरातील अशाप्रकारची ही दुसरी घटना आहे. तर 2024 मधील 11 वी घटना आहे. "मोहम्मद अब्दुल अरफाथ, ज्यांच्यासाठी शोधमोहीम सुरू होती, ते क्लीव्हलँड, ओहायो येथे मृतावस्थेत आढळून आल्याचे कळल्यावर दुःख झाले," असे न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे. (Indian Student In Us)

अमेरिकेतील क्लीव्हलँड विद्यापीठाच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यासाठी ते अमेरिकेतील स्थानिक एजन्सींच्या संपर्कात असल्याचे वाणिज्य दूतावासाने सांगितले आहे. आम्ही शोकग्रस्त कुटुंबाला त्यांचे पार्थिव भारतात नेण्यासाठी सर्वतोपरी मदत करत आहोत," असे वाणिज्य दूतावास पुढे म्हणाले. (Indian Student In Us)

क्लीव्हलँड विद्यापीठातून माहिती तंत्रज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी अर्फाथ मे 2023 मध्ये अमेरिकेत आला होता. २५ वर्षीय तरुण ७ मार्चच्या सुमारास बेपत्ता झाला. तेव्हापासून त्याचा अरफाथशी संपर्क तुटल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले आणि त्याचा फोनही बंद होता. (Indian Student In Us)

मार्च १९ रोजी, अरफाथच्या कुटुंबाला खंडणीचा कॉल आला आणि सांगण्यात आले की, ड्रग्स विकणाऱ्या टोळीने त्याचे अपहरण केले आहे. त्याच्या सुटकेसाठी 1,200 डॉलरची मागणी केली. कॉलरने खंडणी न दिल्यास विद्यार्थ्याची किडनी विकण्याची धमकीही दिली होती, असे अरफाथच्या वडिलांनी सांगितले आहे. (Indian Student In Us)

अमेरिकेतील भारतीय किंवा भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांचा समावेश असलेली ही 11वी घटना आहे. गेल्या आठवड्यात ओहायोमधील उमा सत्य साई गड्डे या भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. हल्ल्यांच्या संख्येत झालेल्या चिंताजनक वाढीमुळे भारतीय-अमेरिकन समुदायामध्ये चिंता निर्माण झाली आहे. (Indian Student In Us)

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news