Chicago student attacked : शिकागोमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर अमानुष हल्ला

Chicago student attacked : शिकागोमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर अमानुष हल्ला
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील शिकागो येथे आणखी एका भारतीय विद्यार्थ्यावर सशस्त्र लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. सय्यद मजहीर अली असे या भारतीय विद्यार्थ्यांचे नाव असून तो मूळचा हैदराबादचा आहे. त्याच्या कुटुंबीयांनी भारत सरकारने हस्तक्षेप करून त्याला योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी केली आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सय्यद मजहीर अली हा शिकागो येथील इंडियाना वेस्लेयन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. ४ फेब्रुवारी रोजी त्याच्या वेस्ट रिज अपार्टमेंटजवळ सशस्त्र दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला आणि मारहाण केली. या हल्यादरम्यान अलीने एक व्हिडीओ व्हायरल करून मदतीचे आवाहन केले. या व्हिडिओमध्ये अली स्वत:ला वाचवण्यासाठी धावत असताना आणि हल्लेखोर त्याचा पाठलाग करत असल्याचे दिसत आहे.

दरम्यान, हैदराबादमधील अलीचे कुटुंब त्याच्या प्रकृतीबद्दल चिंतीत आहेत. त्याच्या पत्नीने परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी संपर्क साधून अमेरिकेला जाण्यासाठी मदतीची विनंती केली आहे. शिकागोमधील भारतीय वाणिज्य दूतावासाने मंगळवारी या प्रकरणात सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेवर अलीने म्हटले की, "अमेरिका हा माझा स्वप्नांचा देश आहे. मी माझी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि माझे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी येथे आलो होतो, परंतु या घटनेने मला मानसिक आघात झाला."

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news